"बाबांनी टेनिस रॅकेटने आईला मारलं अन्...", गश्मीरने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:22 PM 2024-02-07T15:22:56+5:30 2024-02-07T15:31:13+5:30
मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीची आई आणि रविंद्र महाजनींच्या पत्नी माधवी महाजनी यांनी लिहिलेलं 'चौथा अंक' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात गश्मीर महाजनीने त्याच्या बालपणीचा एक प्रसंग सांगितला आहे. मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीची आई आणि रविंद्र महाजनींच्या पत्नी माधवी महाजनी यांनी लिहिलेलं 'चौथा अंक' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.
या पुस्तकात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या पुस्तकात गश्मीर महाजनीने त्याच्या बालपणीचा एक प्रसंग सांगितला आहे.
गश्मीर म्हणतो, "बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं. ते त्या आठवणीच ठरवतात. माणसाच्या स्मरणशक्तीचं हे मोठं रहस्य आहे. टेनिस प्रॅक्टिस संपवून १० वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो."
"लिव्हिंग रुममध्ये माझं चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता. कोचावर बाबा काळा चष्मा लावून बसले होते. बेडरुमकडे जाणाऱ्या जीन्यावर आई उभी होती."
"मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं. ते मी येतात टाइम प्लीज घेतल्यासारखं थांबलं. कोचावर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली."
"तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली की गशू पोलिसांना फोन लाव. आणि बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्या अंगावर धावून गेले. आई बेडरुमकडे धावली. बेडरुमच्या दारावर रॅकेट बडवण्याचे आवाज घरभर घुमू लागले."
"घरातील कुत्रे भुंकू लागले आणि मी बसल्या जागी भोकाड परसलं. थोड्यावेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले. माझी रॅकेट कोचावर ठेवली आणि काही नाही झालं तुझ्या आईला असं म्हणून निघून गेले."
"त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत होते. फक्त कधी दार बडवलं जायचं तर कधी माझी आई...एवढाच काय तो फरक. "
"भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत असतात. आता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची आपल्याला कल्पना असते."
"तो निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हेदेखील आपल्याला माहीत असतं. आपली मालमत्ता बेफिकिरपण लोकांवर उधळायचे काय परिणाम होतील हे माझ्या आईच्या वडिलांना माहीत होतं."
"माझ्या वडिलांशी लग्न करण्याचे काय परिणाम होतील, हेदेखील माझ्या आईला व्यवस्थित माहीत होतं."