'सबसे कातिल' गौतमी पाटीलचा ग्लॅमरस लूक, लवकरच स्टार प्रवाहच्या नव्या कार्यक्रमात झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:33 IST2025-04-22T15:13:59+5:302025-04-22T15:33:18+5:30

स्टार प्रवाहच्या नव्या शोसाठी गौतमी पाटीलचं बदललं रुप

'सबसे कातिल' गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

गौतमी आता छोटा पडदा गाजवण्यासाठीही सज्ज झाली आहे. 'स्टार प्रवाह'च्या 'शिट्टी वाजली रे' (Shitti Vajali Re) या कार्यक्रमात गौतमी पाटील सहभागी होणार आहे.

२६ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमातून गौतमीचं पाककौशल्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नुकतंच या कार्यक्रमाचे प्रोमो प्रदर्शित झालेत. यात गौतमीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला आहे.

गौतमी कोऑर्ड सेट, त्यावर ब्लेझर आणि त्यावर साजेसा मेकअप अशा लूकमध्ये दिसली.

गोतमी ही कायम साडी, कुर्तीमध्ये दिसून आली आहे. पण, चाहत्यांना आता तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळणार आहे.

लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून, पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील.

आपल्या नृत्यानं मनं जिंकणारी गौतमी स्वयंपाकात कुशल आहे का, हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.