सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री या सिनेमात दिसणार लावणी करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:41 IST2025-04-03T18:33:53+5:302025-04-03T18:41:00+5:30

Saie Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर लावणी सादर करताना दिसणार आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर कधी आपल्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. लवकरच ती इमरान हाश्मीसोबत ग्राउंड झिरो सिनेमात दिसणार आहे.

ग्राउंड झिरो सिनेमाशिवाय सई ताम्हणकर आणखी एका सिनेमात झळकणार आहे आणि तेही हटके अंदाजात.

सई देवमाणूस या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात ती लावणी सादर करताना दिसणार आहे. ती पहिल्यांदाच लावणी करताना दिसेल.

हे गाणे एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे.

याबद्दल सई सांगते, लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे.

पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी, यासाठी खूप उत्सुक असल्याचे सईने म्हटले.

सई पुढे म्हणाली की, आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे!

लव फिल्म्स’ प्रस्तुत ‘देवमाणूस’, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.