ना हाइट ना पर्सनॅलिटी म्हणत रिजेक्ट झाला होता गोविंदा, असा मिळाला होता पहिला सिनेमा.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 03:13 PM 2020-12-21T15:13:22+5:30 2020-12-21T15:25:20+5:30
तीन दशकांच्या करिअरमध्ये गोविंदाने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण पहिला सिनेमा मिळवण्यासाठी त्याला बरेच पापड लाटावे लागले होते. एका मुलाखती गोविंदाने याबाबत सांगितले होते. बॉलिवूडमध्ये नंबर वन सीरीजच्या सिनेमांसाठी लोकप्रिय गोविंदा आज ५७(२१ डिसेंबर)वर्षांचा झाला. २१ डिसेंबर १९६३ मध्ये विरारमध्ये जन्मलेल्या गोविंदाच्या करिअरची सुरूवात ३४ वर्षाआधी आलेल्या 'तन-बदन' सिनेमातून केली होती. तीन दशकांच्या करिअरमध्ये गोविंदाने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण पहिला सिनेमा मिळवण्यासाठी त्याला बरेच पापड लाटावे लागले होते. एका मुलाखती गोविंदाने याबाबत सांगितले होते.
गोविंदानुसार, त्याचा पहिला सिनेमा तन-बदन होता. मोठ्या मेहनतीनंतर त्याला यात काम करण्याची संधी मिळाली होती. स्ट्रगलिंगच्या दिवसात गोविंदाने अनेक महिने लोकल ट्रेनने प्रवास करत होता.
यात प्रवासात गोविंदाचे ४ ते ५ तास जात होते. नंतर गोविंदा मामाच्या घरी खारमध्ये येऊन राहू लागला होता. तेथूनच तो कामाच्या शोधात इकडे-तिकडे फिरत होता.
गोविंदाने सांगितले होते की, त्याने त्याच्या अॅक्टिंगची एक व्हिडीओ टेप तयार केली होती. सोबतच रोशन तनेजा अॅक्टिंग स्कूलही जॉइन केलं होतं. त्यासोबत फाइट क्लास आणि सरोज खान यांचे डान्स क्लासही सुरू केले होते.
त्याने सांगितले होते की, एक दिवस तो त्याची व्हिडीओ टेप घेऊन दिग्दर्शक इस्माइल श्रॉफकडे पोहोचला. त्यांनी मला बघताच रिजेक्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, ना हाइट आहे ना पर्सनॅलिटी ना आवाज. आता तर अमिताभच्या हाइटच्या लोकांची गरज आहे.
तो पुढे म्हणाला की, एकदा तो मित्रासोब गुमठीमध्ये पान खात होता. तेव्हाच बीआर चोप्रा कॅम्पचा जनरल मॅनेजर राहिलेल्या गूफी पेंटल यांची नजर माझ्यावर पडली आणि ते मला बीआर यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. यानंतर तिथे एक प्रोग्राम होत होता. त्यात त्यांनी माझ्याकडून अॅक्टिंग करून घेतली आणि माझे सगळे सीन एका टेकमध्ये ओके झाले होते.
गोविंदानुसार, त्यावेळी माझं काम त्यांना आवडलं होतं. तेव्हा त्यांनी मला एक तासाची एक शॉर्टफिल्म करायला दिली. त्यानंतर मला जाणीव झाली होती की, लोकांना आपलं काम दाखवलं जावं कारण त्याला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो.
काही दिवसांनी मी ऑडिओ कॅसेज मामाला दाखवली. जे एक सिनेमा सुरू करणार होते आणि त्यात त्यांना एक हिरोची गरज होती. मामाने माझी व्हिडीओ कॅसेट पाहिली तेव्हा त्यांनी सिनेमाच्या हिरोसह संपूर्ण कास्टिंग आणि स्टोरी बदलली. त्यांनी मला सिनेमात घेतलं. याप्रकारे मला माझा पहिला सिनेमा 'तन-बदन' मिळाला. पण याआधी ही बाब सीक्रेट ठेवण्यात आली होती की मला सिनेमासाठी सिलेक्ट करण्यात आलं आहे.
तो म्हणाला की, एक दिवस रात्री मी ८ वाजता चुलत भावासोबत घरी पोहोचलो. जानेवारी महिना होता. तिथे माझ्या मामाने सांगितले की, आम्ही सिनेमासाठी एक मुलगा सिलेक्ट केलाय. मला याबाबत काहीच आयडिया नव्हती.
यानंतर मामाने सांगितले की, तू डोळे बंद करत मी तुला त्याचा फोटो दाखवतो. मी जसे डोळे बंद केले त्यांनी माझ्या गालावर चापट मारली आणि माझा गाल लाल झाला. यानंतर मामा म्हणाले की, तूच या सिनेमाचा हिरो आहे. हे ऐकताच मी आनंदाने नाचू लागलो होतो.