Ufff!! दीड लाखांचा डेनिम कॉर्सेट टॉप घालून Kiara Advaniने दिल्या किलर पोझ, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 02:22 PM2022-11-21T14:22:31+5:302022-11-21T14:29:28+5:30

Kiara Advani Photoshoot : डेनिम कॉर्सेट टॉप आणि ब्लॅक फॉक्स लेदर पँटमध्ये कियाराने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

कियारा अडवाणीचे लाखो फॅन्स आहेत. कियाराची प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करते. आता हे फोटोच बघा...

डेनिम कॉर्सेट टॉप आणि ब्लॅक फॉक्स लेदर पँटमध्ये कियाराने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

केंडिट पोझ देत कियाराने अनेक फोटो क्लिक केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

बेडरूममध्ये क्लिक केलेल्या या फोटोत कियाराने स्मोकी आय मेकअप केलं आहे. केसांना वेवी टच दिला आहे.

‘गोविंदा नाम मेरा’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कियाराने याच लुकमध्ये हजेरी लावली.

या लुकवर कियाराने लाखो रूपये खर्च केलेत. 1 लाख 14 हजाराचा फॉक्स लेदर पँट, 1 लाख 23 हजारांचा डेनिम कॉर्सेट घातला होता.

तिने घातलेल्या हाय हिल्स सँडलची किंमत 1 लाख 54 हजार होती. 2 लाख 20 हजाराची हँड बॅग तिने कॅरी केली होती.

‘गोविंदा नाम मेरा’ या सिनेमात विकी कौशल लीड रोलमध्ये आहे. सोबत भूमी पेडणेकर व कियाराच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपटात कियाराने विकीच्या गर्लफ्रेन्डची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री सिनेमा आहे. सोबत कॉमेडीचा तडका आहे.

शशांक खेतानने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा करण जोहरने प्रोड्यूस केला आहे. येत्या 16 डिसेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा रिलीज होतोय.