सोनाली कुलकर्णीचं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट, लाल लेहेंग्यात ग्लॅमरस अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 01:19 PM2024-10-31T13:19:12+5:302024-10-31T13:27:02+5:30

सोनाली कुलकर्णीने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

सोनाली कुलकर्णी हटके अंदाजात लाल लेहेंग्यात फोटो क्लिक केले आहेत.

या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसते आहे.

लाल लेहेंग्यात सोनालीने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Open Hair Style) करत हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे.

तिचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

"सणांचा राजा असा दीपोत्सव.धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव दिपावली.दीपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा..!" असं कॅप्शन देत सोनालीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनालीचे हे दिवाळीतील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाले आहे.

अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

सोनाली कुलकर्णी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो शेअर करत असते.

सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच सजग असते.