संकर्षण कऱ्हाडेच्या पत्नीला पाहिलंत का?, साधं राहणीमान पण दिसते खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 03:38 PM2024-08-29T15:38:15+5:302024-08-29T15:42:50+5:30

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडे बऱ्याचदा पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि गुणी अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. त्याने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

संकर्षण कऱ्हाडे सध्या झी मराठी वाहिनीवरील ड्रामा ज्युनिअर्समध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतो आहे.

संकर्षण कऱ्हाडेचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे आणि त्यांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते.

संकर्षण कऱ्हाडेच्या पत्नीला पाहिलंत का? त्याच्या पत्नीचं नाव शलाका पांडे आहे.

तीदेखील खूप सुंदर दिसते पण ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

संकर्षण सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

त्यांच्यात खूप छान बॉण्डिंग पाहायला मिळते.

संकर्षणला जुळी मुलं आहेत. मुलाचं नाव आहे सर्वज्ञ तर मुलीचं नाव आहे स्रग्नी.

संकर्षणची पत्नी शलाका हीदेखील कलाकार आहे.

ती चित्रकार असून अनेक पेटिंग सोशल मीडियावर शेअर करत असते.