‘अक्षरा बहू’ हिना खान झाली कधी नव्हे इतकी बोल्ड; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:30 PM2020-03-19T13:30:13+5:302020-03-19T13:43:00+5:30

हिच्या अदांवर व्हाल फिदा...

टीव्ही अभिनेत्री हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहू’ म्हणून अधिक ओळखतात.

‘संस्कारी बहू’ ही ओळख पुसण्यासाठी हिनाने जीवाचा बराच आटापीटा केला.

साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मालिका सोडत आव्हानात्मक कामे स्विकारली.

बिग बॉस 11 आणि खतरों के खिलाडी सिझन 8 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली.

बॉलिवूडमध्येही तिचा डेब्यू झाला. ‘हॅक्ड’ या सिनेमातून तिने डेब्यू केला.

हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.

तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

स्वत:चे बोल्ड आणि हटके अंदाजातील फोटो ती शेअर करत असते.

ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की या टीव्ही मालिकांतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खानची कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाणारी पहिली टीव्ही अभिनेत्री ओळख आहे.

कसौटी जिंदगी की या लोकप्रिय मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये हिना कोमोलिकाची भूमिका साकारताना दिसली होती.

हिना कोमोलिका बनून पडद्यावर आली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये तिने स्वत:ची छाप सोडली.

जुन्या कोमोलिकाला विसरून प्रेक्षक नव्या कोमोलिकाच्या प्रेमात पडले. पण काहीच महिन्यानंतर हिना ‘कसौटी जिंदगी के 2’ सोडणार अशी बातमी आली आणि प्रेक्षकांची निराशा झाली.

कसौटी जिंदगी के 2 मधून गायब हिना झाली. कशासाठी तर चित्रपटासाठी. ‘हॅक्ड’ या सिनेमात ती झळकली.