Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 04:07 PM2024-05-16T16:07:03+5:302024-05-16T16:56:50+5:30

Hina Khan : हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमधून अभिनेत्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोमधून अभिनेत्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती लोकप्रिय झाली.

हिना अनेक चित्रपट आणि सीरिजमध्येही दिसली आहे. अभिनेत्री तिच्या कामाबद्दल खूप उत्साही आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

अभिनेत्रीने आता मासिक पाळीसंदर्भात आपलं मत मांडलं आहे. तिने मासिक पाळीचे पहिले दोन दिवस शूटिंग न करण्याचा पर्याय असायला हवा,विशेषतः जेव्हा पळण्याचा सीन असतो असं म्हटलं आहे.

हिना खानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून मासिक पाळीतील दोन दिवस शूटिंग न करण्यावर भर दिला आहे.

"जर माझ्या मासिक पाळीतील पहिले 2 दिवस शूटिंग न करण्याचा पर्याय मला मिळाला असता तर... मी अतिशयोक्ती करत नाही."

"वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना 40 डिग्री उष्णतेमध्ये बाहेरच्या ठिकाणी शूटिंग करण्याची कल्पना करा."

"मूड स्विंग्स होणं, डिडायड्रेशन, गरमीमध्ये रॅशेस येतात. अस्वस्थ वाटत राहतं. ब्लड प्रेशर लो होऊन जातं."

उन्हात अशाप्रकारचा सीक्वेन्स शूट करण्यासाठी खूप धावपळ करावी लागणं हे वेड होण्यासारखं आहे" असं हिनाने म्हटलं आहे. तसेच ActorsLife हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

हिना खान 'शिंदा शिंदा नो पापा' या पंजाबी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात हिना खानसोबत गिप्पी ग्रेवाल दिसला होता.

अभिनेत्री लवकरच 'नामाकूल' या कॉमेडी ड्रामा वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तिचे असंख्य चाहते असून ते तिच्या अदांवर फिदा होतात.