अबब! जेम्स बॉन्डमधील अभिनेत्रीच्या बिकिनीची किंमत वाचून जाल चक्रावून, लवकरच होणार लिलाव... By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:16 PM 2020-10-12T14:16:28+5:30 2020-10-12T14:38:22+5:30
उर्सुला एंड्रेस ज्यांनी १९६२ मध्ये Dr. No सिनेमात हनी रायडर नावाची भूमिका साकारली होती. या सिनेमात त्यांनी जी बिकीनी वापरली होती ती त्यावेळी फार चर्चेचा विषय ठरली होती. आयकॉनिक बिकीनी जी अभिनेत्री उर्सुला एंड्रेसने पहिल्यांदा जेम्स बॉन्ड सीरीजचा पहिला सिनेमा Dr. No मध्ये घातली होती ती बिकीनी आता तुमची होऊ शकते. आता या बिकीनीचा लिलाव होणार आहे. auctioneers Profiles in History बुधवारी सांगितले की, या आयव्हरी रंगाच्या बिकीनीचा लिलाव होणार आहे.
उर्सुला एंड्रेसची बिकीनी लॉस एंजलिसमध्ये १२-१३ नोव्हेंबरला लिलावासाठी ठेवली जाणार आहे. याची प्राथमिक किंमत $500,000 म्हणजे भारतीय करन्सीनुसार ६५ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.
उर्सुला एंड्रेस ज्यांनी १९६२ मध्ये Dr. No सिनेमात हनी रायडर नावाची भूमिका साकारली होती. या सिनेमात त्यांनी जी बिकीनी वापरली होती ती त्यावेळी फार चर्चेचा विषय ठरली होती.
उर्सूला एंड्रेसने पहिल्यांदा बिकीनी २००२ मध्ये लंडनमध्ये एका लिलावात विकली होती. पण त्यावेळी ही बिकीनी केवळ $45,200 मध्ये विकली गेली होती. आता यावेळी याची प्राथमिक किंमत जास्त ठेवण्यात आली आहे.
Auctioneers Profiles in History चे मुख्य Brian Chanes ने बिकीनीबाबत सांगितले की, ही जगातली सर्वात फेमस बिकीनी मानली जाते.
Dr. No सिनेमाबाबत सांगायचं तर हा सिनेमा ५ ऑक्टोबर १९६२ ला रिलीज झाला होता. Sean Connery यांची यात मुख्य भूमिका होती. तर Terence Young यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यावेळी हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.