एकही हिट सिनेमा नाही तरीही ६० हजार कोटींची मालकीण! कोण आहे जगातली ही सर्वात श्रीमंत अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:49 IST2025-01-14T12:21:22+5:302025-01-14T12:49:18+5:30

हॉलिवूड, बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये या अभिनेत्रीचं नाव घेतलं जातं

जगातील या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीचं नाव आहे जैमी गर्टज. अमेरिकन अभिनेत्री असलेल्या जैमी गर्टजने संपत्तीच्या बातमीत अनेक लोकप्रिय अभिनेत्रींना मागे टाकलंय

जैमी गर्टज एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि व्यावसायिक आहे. तिची एकूण संपत्ती ८ बिलियन म्हणजे ६६ हजार कोटी इतकी आहे.

जैमी गर्टज सध्या ५९ वर्षांची असून शिकागोमध्ये तिचा जन्म झाला होता. आजही जैमी गर्टजच्या सौंदर्याची तिच्या चाहत्यांना भुरळ आहे.

१९८० च्या दशकात जैमी गर्टजने सिनेमांमध्ये तिचं नशीब आजमावलं. 'अॅव्हेंजर्स' फेम रॉबर्ट डाऊनी ज्यु.चे वडील रॉबर्ट डाऊनीसोबत तिने काम केलं.

परंतु आजवर लीड अभिनेत्री म्हणून जैमी गर्टजचा एकही सिनेमा सुपरहिट नाहीये. परंतु वेळीच जैमीने विविध ब्रँड्स सोबत पार्टनरशीप करुन चांगली कमाई केली

परिणामी आज जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जैमी गर्टजचं नाव येतं. १९८९ साली जैमीने लग्न करुन तिला आज तीन मुलं आहेत

आजही जैमी गर्टज अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळे अन् इव्हेंट्सना हजेरी लावून लाइमलाइटमध्ये असते. अजूनही जैमीची तिच्या चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.