'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 08:29 PM 2024-10-15T20:29:51+5:30 2024-10-15T20:51:17+5:30
Taylor Swift Net worth, world richest female musician: 'फोर्ब्स'च्या ताज्या यादीनुसार, टेलर स्विफ्टने जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार बनण्याचा बहुमान मिळवलाय. Taylor Swift Net worth, world's richest female musician: टेलर स्विफ्ट ही एक जगप्रसिद्ध हॉलीवूड म्यूजिशियन आहे. तिच्या गाण्यांसाठी ती जगभरात लोकप्रिय आहे. चाहत्यांना तिची गाणी खूप आवडतात. भारतातही तिचे भरपूर फॅन्स आहेत.
अलीकडेच फोर्ब्सने एक यादी जाहीर केली. त्यात टेलर स्विफ्ट ही अधिकृतपणे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार बनली आहे. तिच्याकडे असलेली संपत्ती भलेभल्यांचे डोळे पांढरे होतील.
टेलर स्विफ्टचा जन्म १३ डिसेंबर १९८९ रोजी पेनसिल्व्हेनिया येथे झाला. प्रसिद्ध गायक जेम्स टेलर यांच्या नावावरून तिचे नाव ठेवण्यात आले.
टेलरने २००४ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर २०२३ मध्ये तिचे नाव जगातील अब्जाधीशांमध्ये सामील झाले.
टेलर स्विफ्ट हे संगीत जगतातील एक प्रसिद्ध नाव असून ती बरीच वर्षे कार्यरत आहे. फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार, टेलर स्विफ्टची एकूण संपत्ती तब्बल १.६ अब्ज अमेरिकन डॉलर्स ( 160 Crores USD ) इतकी आहे.
टेलर स्विफ्ट हिने आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिला संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या यादीत दुसरी असलेली रिहाना हिची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स आहे.
टेलर स्विफ्टच्या संपत्तीतील एक मोठा भाग म्हणजे अंदाजे ०.६ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न हे तिला विविध कॉन्सर्ट, दौरे आणि गाण्यांच्या रॉयल्टीमधून मिळतात.
याशिवाय आणखी ०.६ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न म्युझिक अल्बमच्या माध्यमातून मिळते, तर १.२ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न हे रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून येते.
टेलर स्विफ्ट हे हॉलीवूडसह देशभरातील तरुणाईच्या परिचयाचे नाव आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणजे टेलरने २०२३ मध्ये फक्त Spotify स्ट्रीमिंगमधून ०.१ अब्ज डॉलर्सची रॉयल्टी मिळवली आहे.
टेलर स्विफ्टचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २८३ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे टेलर स्विफ्ट अनेक सोशल मीडियावरूनही बरेच उत्पन्न मिळवते.