जेव्हा मुलाला ड्रग्स केसमध्ये झाली होती अटक, जॅकी चेनने जगाची मागितही होती माफी By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 12:47 PM 2021-10-09T12:47:42+5:30 2021-10-09T12:57:05+5:30
Jackie chan : २०१५ मध्ये बीजिंगच्या कोर्टात jaycee ने मान्य केलं होतं की, तो दुसऱ्यांना त्याच्याजवळचं ड्रग्स वापरण्यासाठी संधी देत होता. तपासातून समोर आलं होतं की, अनेक सेलिब्रिटी Jaycee च्या अपार्टमेंटमध्ये ड्रग्स घेण्यासाठी येत होते. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत सगळ्याच इंडस्ट्री नेहमी वादात सापडतात. स्टार्सना आपल्या आयुष्यात कोणत्या नो कोणत्या मोठ्या वादाचा सामना करावा लागतो. आता सध्या चर्चा सुरू आहे ती मनोरंजन विश्वातील ड्रग्स सेवनाबाबत. यालाच धरून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चीनचा फेसम स्टार जॅकी चेनबाबतचा एक कौतुकास्पद किस्सा.
जॅकी चेन हा जगभरात फेमस आहे. पण एक वेळी अशीही होती की, या स्टार जगासमोर मान खाली घालावी लागली होती. ही घटना आहे २०१४ मधील जेव्हा जॅकी चेनचा मुलगा Jaycee Chan ला चीन पोलिसांनी अटक केली होती. अभिनेता आणि म्युझिशिअन असलेल्या Jaycee Chan वर ड्रग्सचं सेवन केल्याचा आरोप होता.
Jaycee Chan जवळ १०० ग्रॅम गांजा सापडला होता. त्याच्या मेडिकल टेस्टमधूनही समोर आलं होतं की, त्याने नशेच्या पदार्थांचं सेवन केलं आहे. त्यावेळी ३२ वर्षीय Jaycee सोबत एक २३ वर्षीय तायवानचा अभिनेता Kai Ko आणि मिस्टर सॉन्ग नावाच्या व्यक्तीला ड्रग्स तस्करीसाठी पकडण्यात आलं होतं.
२०१५ मध्ये बीजिंगच्या कोर्टात jaycee ने मान्य केलं होतं की, तो दुसऱ्यांना त्याच्याजवळचं ड्रग्स वापरण्यासाठी संधी देत होता. तपासातून समोर आलं होतं की, अनेक सेलिब्रिटी Jaycee च्या अपार्टमेंटमध्ये ड्रग्स घेण्यासाठी येत होते.
याप्रकरणी Jaycee ला सहा महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सोबतच त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे जॅकी चेनला मान खाली घालावी लागली होती. त्याने एका प्रतिक्रियेत सांगितलं होतं की, तो त्याच्या मुलाच्या कारनाम्याने दु: खी आहे.
जॅकी चेनला २००९ मध्ये चीन पोलिसांनी Narcotics Control Ambassador घोषित केलं होतं. तो चीनमधील ड्रग्स विरोधी मोहिमेचा चेहरा होता. अशात त्याचा मुलगाच ड्रग्स प्रकरणात सापडल्याने तो फार निराश होता.
जॅकी चेनने त्यावेळी जगाची माफी मागितली होती. त्याने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, 'मला फारच वाईट वाट आहे. मला माझ्या मुलाच्या कृत्याचा राग येतोय. मला आशा आहे की, Jaycee ची कहाणी तरूणांच्या कामी येईल आणि ते ड्रग्सपासून दूर राहतील. मी माझ्या मुलाला योग्य संस्कार देऊ शकलो नाही आणि मी याची पूर्ण जबाबदारी घेतो. Jaycee आणि समाजासमोर वाकून माफी मागतो'.
तेच जॅकी चेन एका मुलाखतीत म्हणाला होता की, तो त्याच्या मुलाला आपल्या संपत्तीतून काहीच देणार नाही. २०११ मध्ये त्याने सांगितलं होतं की, 'जर तो याच्या लायक आहे, तर स्वत: पैसे कमावेल'. जॅकी चेन म्हणाला होता की, तो त्याची संपत्ती एकुलता एक मुलगा Jaycee ला देण्याऐवजी चॅरिटीला डोनेट करेल.