कसा झाला होता ब्रूस ली याचा मृत्यू? आजही रहस्य बनून आहे त्याचं जग सोडून जाणं! By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:27 PM 2021-09-01T14:27:36+5:30 2021-09-01T14:36:42+5:30
Bruce Lee : ब्रूस ली ने आपल्या कलेने जगभरात नाव आणि पैसा कमावला. पण त्याच्या जीवनाचा सर्वात दु:खद वळण म्हणजे त्याचा मृत्यू. जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हटल्या जाणाऱ्या ब्रूस ली याला अजेय समजलं जात होतं. जगातील प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली याला जग कधीही विसरू शकणार नाही. ब्रूस ली याचा जन्म २७ नोव्हेंबर १९४० मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात झाला होता. २० जुलै १९७३ मध्ये केवळ ३३ वर्षांचा असताना त्याचं निधन झालं होतं. ब्रूस ली आज त्याच्या मागे एक मोठं काम सोडून गेलाय. ज्याला जगभरात फिटनेस म्हटलं जातं.
ब्रूस ली दिसायला फारच सडपातळ होता. मग ताकद अशी होती की, १ इंच अंतरावरून कोणत्याही शक्तीशाली व्यक्तीचा श्वास रोखू शकत होता. ब्रूस ली मार्शल आर्टिस्ट तर होताच सोबतच एक चांगला अभिनेताही होता. पण तो अभिनेता म्हणून केवळ ७ हॉलिवूड सिनेमेच करू शकला. यातील ३ तीन सिनेमे त्याच्या निधनानंतर रिलीज झाले होते. तरीही त्याला हॉलिवूड हॉल ऑफ फेममध्ये सामिल केलं.
असं सांगितलं जातं की, ब्रूस ली एक नॉन क्लासिकल मार्शल आर्टिस्ट होता. त्याने कोणत्याही पारंपारिक कुंग-फू स्कूलमधून शिक्षण घेतलं नव्हतं. ब्रूल ली ने कुंग-फू ऐवजी 'विंग चुन'ची निवड केली होती. १३ वर्षाचा असताना त्याची भेट मास्टर यिप मॅनसोबत झाली होती. ते विंग चुन शैलीच्या 'गंग फू' चे शिक्षक होते. ५ वर्ष यिप मॅनच्या सानिध्यात राहून ब्रूल ली आपल्या मेहनीने 'विंग चुन'चा मास्टर झाला होता.
१९५९ मध्ये ब्रूस ली याने एका मार्शल आर्ट स्कूलची सुरूवात केली. या स्कूलमध्ये तो 'जन फॅ गंग फू' शिकवत होता. ब्रूस ने मार्शल आर्ट शिकणाऱ्यांच्या फिटनेस आणि योग्य डाएटवर लक्ष दिलं. आपल्या या थेअरीचे ली यालाही खूप फायदे झाले. ब्रूस लीने त्याच्या नव्या टेक्नीकच्या जोरावर एका फाइटमध्ये सिफू वांग जॅकमॅन यालाही हरवलं. सीफू कुंग फू मास्टर होते. ज्यांना कुणी हरवू शकत नव्हतं. पण ब्रूस लीने ते केलं.
ब्रूस ली याला महान मार्शल आर्टिस्ट केवळ त्यांच्या शारीरिक क्षमतांमुळे मानलं जात नाही. ब्रूस ली याने मार्शल आर्टच्या मूळ प्रकारांत असे काही बदल केले की, ज्याच्या आधारावर एथलीट्स, हॉलिवूड स्टार्स आणि मार्शल आर्टिस्टचे फिटनेस शेड्यूल ठरतात.
ब्रूस ली म्हणत होता की, 'शरीरला मशीनपेक्षा चांगलं प्रदर्शन करवण्यासाठी त्यात योग्य इंधन टाकणं गरजेचं आहे. जंक फूड आणि चुकीच्या डाएटने शरीर स्लो होतं'.
असं सांगितलं जातं की, ब्रूस ली सेरेब्रल इडेमाने पीडित होता. सेरेब्रल इडेमा एक असा आजार आहे ज्यात मनुष्याच्या मेंदूवर सूज येते आणि याने पीडित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. ते अचानक बेशुद्धही पडतात. ब्रूस ली त्याच्या या आजारामुळे अनेकदा सिनेमांच्या सेटवर बेशुद्ध पडत होता.
ब्रूस ली ने आपल्या कलेने जगभरात नाव आणि पैसा कमावला. पण त्याच्या जीवनाचा सर्वात दु:खद वळण म्हणजे त्याचा मृत्यू. जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हटल्या जाणाऱ्या ब्रूस ली याला अजेय समजलं जात होतं. पण त्यादरम्यान अचानक त्याचा मृत्यू झाला. आणि अनेक अफवा पसरल्या. कुणी म्हणाले की ब्रूस ली याचा मृत्यू एका श्रापामुळे झाला. तर काही म्हणत होते की, गुप्त चीनी संस्था ट्रिआडने काही कारणांसाठी ब्रूस ली याची हत्या केली होती. पण अफवा सोडल्या तर त्याच्या मृत्यूचं अधिकृत कारण वेदनादायी आहे.
२० जुलै १९७३ ला ब्रूस ली ने हॉंगकॉंगमध्ये दुपारी ४ वाजता त्याच्या आगामी 'गेम ऑफ डेथ' सिनेमाबाबत निर्माता रेमंड चो याची भेट घेतली. या भेटीनंतर सायंकाळी ब्रूस ली याचं अचानक डोकं दुखू लागलं होतं. हे बघून त्याची हिरोईन बेट्टी तिंग पेईने त्याला पेनकिलर टॅबलेट दिली. औषध घेतल्यावर ली झोपला. पण रात्री जेव्हा तो डीनरसाठी उठला तेव्हा डॉक्टरांना बोलवण्यात आलं.
यावेळी डॉक्टरांनी १० मिनिटांपर्यंत ब्रूस ली याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आलं नाही. यानंतर त्याला लगेच क्लीन एलिजाबेथ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोस्टमार्टम रिपोर्टनुसरा, ब्रूस ली च्या शरीरात एस्प्रिन आणि मेप्रोबामेटने रिअॅक्शन केलं होतं. ज्यामुळे त्याच्या मेंदूची साइज १३ टक्के वाढली होती आणि ३२ वयात मार्शल आर्टचा लीजंड झोपेतच श्वास रोखला गेल्याने मरण पावला.