एकही चित्रपट न करता राखी सावंत आहे कोटयाधीश; पाहा नेमका कसा कमवते पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 03:12 PM2022-03-20T15:12:33+5:302022-03-20T15:16:13+5:30

Rakhi sawant:राखीच्या नावावर एकूण ३७ कोटी रुपयांच्या संपत्ती असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, तिच्याकडे हा पैसा कुठून येतो हा प्रश्न अनेकांना पडतो.

आपल्या अतरंगी स्टाइल आणि वायफळ बडबड यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत.

नीरु भेडा हे खरं नाव बदलून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी राखी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

अग्नीचक्र या चित्रपटातून राखीने सिनेसृष्टीत पदार्पण केल्याचं म्हटलं जातं. मात्र, या नंतर ही कोणत्याही चित्रपटात अभिनेत्री म्हणून फारशी झळकली नाही.

सध्याच्या घडीला राखी कोणत्याही चित्रपट वा जाहिरातींमध्ये दिसत नाही. मात्र, तरीदेखील ती कोटयावधींची मालकीण असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच ती इतकी कमाई कशी करते पाहुयात.

राखी खासकरुन तिच्या आयटम साँगसाठी ओळखली जाते.

राखीच्या नावावर एकूण ३७ कोटी रुपयांच्या संपत्ती असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, तिच्याकडे हा पैसा कुठून येतो हा प्रश्न अनेकांना पडतो.

राखी सावंतचे मुंबईत दोन मोठे आलिशान फ्लॅट आहेत. तसंच तिच्याकडे कारदेखील आहे. इतंकच नाही तर तिचा एक ११ कोटींचा बंगलादेखील आहे.

राखी सावंत चित्रपटात काम करत नसली तरीदेखील ती स्टेज शो वगैरे करत असते. त्यातून तिचं घर चालतं.

राखीने आतापर्यंत अनेक स्टेज शो, बिग बॉस असे रिअॅलिटी शो केले आहेत. तसंच ती वेगवेगळे डान्सचे स्टेज शोदेखील करते.

राखीने विदेशातही डान्सचे कार्यक्रम केले आहेत. त्यामुळे रिअॅलिटी शो,डान्स हे तिच्या उत्पन्नाचं मुख्य साधन मानलं जातं.

राखीला जोरू का गुलाम, जिस देश में गंगा रहा है, ये रास्ते में अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. मात्र, परदेसीयाँ या गाण्यातून ती विशेष लोकप्रिय झाली.