अस्सा नवरा सुरेख बाई! रोहित रेड्डी पत्नी अनिता हंसनंदानीची प्रेग्नंसीदरम्यान घेतोय अशी काळजी !! By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 11:05 AM 2020-10-12T11:05:15+5:30 2020-10-12T11:16:48+5:30
अनिता हसनंदानी प्रेग्नंट असल्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. बेबी बंम्प फ्लाँट करतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खूशखबर दिली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अनिता हंसनंदानी आणि रोहित रेड्डीसर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.
रोहितही अनिताची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.
सध्या अनिता प्रेग्नंट आहे त्यामुळे तिला जराही कोणत्या गोष्टीचा त्रास होार नाही याची खबरदारी सध्या रोहित घेताना दिसतोय.
अनिताने नेहमी आनंदितच राहावे असा त्याचा अट्टहास असतो. त्यामुळे सध्या हे कपल त्यांचे खास क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत.
अनिता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक सरप्राइज देणार असल्याचे चाहत्यांना सांगत होती. अखेर तिने व्हिडीओ शेअर करत सरप्राईज दिली.
अनिताही आई होणार असल्याची गुड न्युज तिने चाहत्यांना सांगताच तिच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
अनिता क्यूट बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. दोघांचा लव्हस्टोचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
अनिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या सगळ्या अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत असते.
घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार म्हटल्यावर दोघे चांगलेश खुश आहेत.