सुझान खानचा हृतिक रोशनसह 17 वर्षे टिकला संसार, ठरला होता सगळ्यात महागडा घटस्फोट By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 07:17 PM 2021-07-01T19:17:42+5:30 2021-07-01T19:35:20+5:30
सुझान खान आणि हृतिक रोशन चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी 2000 मध्ये लग्न केले होते. 20 डिसेंबर 2000 रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या 6 वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात दोन मुलांचे आगमन झाले होते. 2006 मध्ये हृहानचा तर 2008 मध्ये हृदानचा जन्म झाला होता. हृतिक आणि सुझान यांचा सुरु असलेला सुखी संसारात नेमके कोणत्या कारणामुळे दुरावा आला हे आजपर्यंत कोणालाच कळाले नाही.
13 डिसेंबर 2013मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 17 वर्षे जूने नात्याला दोघांनी पूर्वविराम लावला.
घटस्फोट झाल्यानंतर खुद्द हृतिक रोशननेच याविषयी माहिती दिली होती. तसेच विवाह संस्थेवर विश्वास असल्याचेही हृतिकने म्हटले होते.
1995 मध्ये अमेरिकेच्या ब्रूक्स कॉलेजमधून सुझानने इंटिरियर डिझायनिंगची पदवी घेतली होती.
2011 मध्ये तिने शाहरुख खानची पत्नी गौरीबरोबर काम करण्यास सुरुवात केली होती.
हृतिक आणि सुझानचा घटस्फोट हा बॉलीवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता.
सुझानने हृतिककडून ४०० कोटी रुपये पोटगी म्हणून मागितल्याच्याही चर्चा झाल्या होत्या.
पण हृतिकने ३८० कोटी रुपये पोटगीच्या रुपात सुझैनला दिल्याचे बोलले जाते.
बॉलिवूडमध्ये आजपर्यंत सर्वाधिक पोटगी देण्याचा रेकॉर्ड या कपलच्या नावावरच आहे.
घटस्फोटानंतरही दोघांमध्ये मैत्री कायम आहे.सुझैनही फॅमिली फंक्शनमध्येही ती अनेकवेळा दिसून येते.