IN PICS : ‘रोशन’ नाही हे आहे हृतिकचं खरं आडनाव, वाचून विश्वास बसणार नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 12:42 PM2022-01-10T12:42:52+5:302022-01-10T13:03:13+5:30

Hrithik Roshan Birthday : बाॅलिवूडचा 'ग्रीक गाॅड' अशी ओळख असलेल्या हृतिकबद्दल या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

हृतिक रोशनने बॉलिवूडमध्ये फक्त आपल्या अभिनयाने नाही तर उत्तम डान्सने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज बॉलिवूडमध्ये अनेक हँडसम अभिनेते आहेत, पण हृतिकला तोड नाही. आज या हँडसम अभिनेत्याचा वाढदिवस.

हृतिकचा जन्म मुंबईच्या पंजाबी कुटुंबात झाला. वाचून आश्चर्य वाटेल पण हृतिक खरं आडनाव रोशन नसून नागरथ आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक 'रोशनलाल नागरथ' हे ह्रतिक रोशनचे आजोबा . रोशनलाल यांचे सुपुत्र आणि ह्रतिकचे वडील राकेश रोशन यांनी अभिनय क्षेत्रामध्ये काम करायचे ठरवले. तेव्हा 'राकेश नागरथ'च्या ऐवजी त्यांनी 'राकेश रोशन' हे नाव वापरायला सुरुवात केली.

उणापुरा 6 वर्षांचा असताना हृतिकने चित्रपटात काम करणं सुरू केलं. त्याचे आजोबा ओम प्रकाश यांच्या ‘आशा’ या चित्रपटात चिमुकला हृतिक डान्स करताना दिसला होता. आजोबांनी यासाठी त्याला 100 रूपये मानधन दिलं होतं.

ह्रतिकच्या उजव्या हाताला एक अतिरिक्त अंगठा आहे. शाळेत असताना ह्रतिकला त्याच्या अतिरिक्त अंगठ्यामुळे इतर मुले त्रास देत असत. त्यामुळे समवयस्कर मुलांसोबत मिसळायला ह्रतिक घाबरायचा.

2012 पर्यंत हृतिक अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे त्रस्त होता. होय अगदी अभिनेता बनल्यानंतरही. वयाच्या तेराव्या वर्षापासून पुढील जवळपास 22 वर्ष हृतिक या अडचणीचा सामना करत होता.

पण आत्मविश्वास, मेहनत आणि दृढ निश्चयाच्या जोरावर त्याने या त्रुटीवर विजय मिळवला. यासाठी त्याने स्पीच थेरपीची मदत घेतली.

‘कहो ना प्यार है’ हा हृतिकचा पहिला सिनेमा. या सिनेमानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

खरं तर हृतिकचा डेब्यू शेखर कपूरच्या ‘तारा रम पम पम’ या चित्रपटातून होणार होता. प्रिती झिंटा या चित्रपटात त्याची हिरोईन होती. पण हा सिनेमा डब्बाबंद झाला आणि हृतिकने वडिलांच्याच ‘कहो ना प्यार है’मधून डेब्यू केला.

‘कहो ना प्यार है’ नंतर हृतिकने मिशन कश्मीर, यादें, कभी कुशी कभी गम, मैं प्रेम की दीवानी हूं, कोई मिल गया,क्रिश, जिंदगी ना मिलेगी दोबारा, लक्ष्य, धूम 2, काईट्स, जोधा अकबर, गुजारिश, अग्निपथ, बँग बँग, काबिल, सुपर 30 आणि वॉर अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.

बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पणानंतरच त्यानं संजय खान यांची मुलगी सुजैन खान हिच्याशी लग्न केलं. पण, त्यांच्या या नात्याला काही वर्षांनी तडा गेला.

पोटगी म्हणून त्यानं सुजैन ला एकदोन नव्हे, तब्बल 380 कोटी रुपये इतरी तगडी रक्कम दिली. जगात आतापर्यंत झालेल्या महागड्या घटस्फोटांमध्ये हृतिक आणि सुझानच्याही घटस्फोटाचा उल्लेख केला जातो. हृतिक आणि सुजैनच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या, तरीही त्यांच्यामध्ये असणारी मैत्री आजही कायम आहे.