Ramayan चं बजेट पाहून डोळे दिपतील! हृतिक-रणबीरला मिळणार प्रत्येकी ७५ कोटी?, कोण कोणत्या भूमिकेत? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 08:47 PM2021-10-09T20:47:50+5:302021-10-09T21:00:22+5:30

Ramayan Cast and Budget: मोठ्या पडद्यावर 'रामायण' साकारण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी उचललं आहे. सिनेमा बिग बजेट असणार असून तब्बल ७५० कोटींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोण-कोण दिसणार आणि कुणाला किती मानधन मिळणार?

Ramayan Cast and Budget: बॉलीवूड अभिनेते हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील आजवरची सर्वात शानदार भूमिका सादर करण्याचं शिवधनुष्य उचलण्यास सज्ज झाले आहेत.

हृतिक, रणबीर दोघं राम आणि रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या बहुचर्चित 'रामायण' (Ramayan) चित्रपटात हृतिक आणि रणबीर यांच्या कास्टिंगवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाचं बजेट तब्बल ७५० कोटी रुपये इतकं असणार आहे. तर हृतिक आणि रणबीर यांना या चित्रपटासाठी देण्यात आलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा मनोरंजन विश्वात सुरू आहे.

'रामायण' पडद्यावर साकारण्याची कामगिरी आजवर अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या वेगवेगळ्या अंदाजात सादर केलेली आपण पाहिली आहे. पण कुणालाही रामानंद सागर यांनी साकारलेल्या 'रामायण'ला मिळालेलं यश आजवर कुणालाच प्राप्त करता आलेलं नाही.

रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका डीडी नॅशनलवर प्रकाशित झाली होती. या मालिकेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता की लॉकडाऊनमध्येही 'डीडी'नं रामायण मालिकेच्या पुर्नप्रसारणाचा निर्णय घेतला होता.

'रामायण' मोठ्या पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य 'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी उचलणार आहेत.

हृतिक, रणबीरला किती मिळालं मानधन? बॉलीवूड हंगामानं दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या प्रोडक्शनशी निगडीत सुत्रांनी हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांना प्रत्येकी ७५ कोटी रुपयांचं मानधन दिलं जाणार असल्याची माहिती दिली आहे.

नितेश तिवारी आणि त्यांची टीम सध्या सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहे. करिना कपूरला सीतेच्या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती असं सांगितलं गेलं होतं. पण सुत्रांच्या माहितीनुसार त्यात कोणतंही तथ्य नव्हतं.

दरम्यान, अभिनेता सैफ अली खान दिग्दर्शक ओम राऊतच्या 'आदिपुरुष' चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. यात रामाची भूमिका 'बाहुबली' फेम प्रभास साकारणार आहे. नुकतंच चित्रपटाचं चित्रीकरण देखील पूर्ण झालं आहे.

Read in English