दु:खात रेखाला लागली होती नशेची लत, घेत होती ड्रग्स; अमिताभ बच्चनसोबत प्रेमावर म्हणाली - काय मी.... By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 04:46 PM 2023-02-21T16:46:18+5:30 2023-02-21T16:57:20+5:30
Rekha Love Life : रेखाच्या अफेअरच्या खूप चर्चा झाल्या. असं म्हणतात की, रेखाचा पहिला पती मुकेश अग्रवाल तिच्यावर खूप प्रेम करत होता. पण नंतर त्यांच्या मदभेद झाले. रेखा (Rekha) चा जन्म साऊथ सिनेमाचे महान अभिनेते जेमिनी गणेशन यांच्या घरात झाला होता. तिची आई पुष्पावल्ली या सुद्धा अभिनेत्री होत्या. पण त्या सहायक भूमिकेत जास्त दिसल्या.
कमी वयातच नंतर परिवाराच्या आर्थिक तंगीमुळे रेखाला सिनेमात काम करावं लागलं. सिनेमात इंटरेस्ट नसूनही वयाच्या 13 व्या वर्षी रेखा सिनेमात काम करू लागली. बालपणी तिला खूप प्रेम मिळालं, पण मोठी झाल्यावर मात्र साथीदारांचं प्रेम मिळू शकलं नाही. चमकदार असलेल्या या अस्थिर जीवनात तिला नशेची सवय लागली.
रेखाच्या अफेअरच्या खूप चर्चा झाल्या. असं म्हणतात की, रेखाचा पहिला पती मुकेश अग्रवाल तिच्यावर खूप प्रेम करत होता. पण नंतर त्यांच्या मदभेद झाले. एक दिवस जेव्हा रेखाच्या पतीच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा तिच्या फॅन्सना धक्का बसला होता. मुकेश अग्रवालने आत्महत्या केली होती.
रेखाला यावरून खूप वाईट बोलण्यात आलं होतं. त्यानंतर रेखाच्या आयुष्यात विनोद मेहरा, जीतेंद्र, संजय दत्त आणि अक्षय कुमारसारखे अभिनेते आले. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती तिच्या अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अफेअरची.
रेखा आज बॉलिवूडच्या सगळ्यात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. सिनेमासोबत तिचं खाजगी आयुष्य जास्त गाजलं. पण तिच्याबद्दल कुणी काहीही बोललं तरी तिला काही फरक पडत नव्हता. त्याउलट तिने तिच्याबाबत आणि तिच्या अफेअरबाबत बिनधास्तपणे वक्तव्ये केली.
मीडिया रिपोर्टनुसार, एका मुलाखतीमध्ये सिमी ग्रेवालने रेखाला तिच्या दारू पिण्याच्या सवयीबाबत विचारलं की, कधी तुमच्या दारू पिण्याच्या सवयीबाबत ऐकलं नाही. यावर रेखा म्हणाली की, 'मी नक्कीच दारू पिते. ड्रग्स घेतलं आहे. मी अपवित्र आहे आणि वासनेने भरलेली आहे'.
रेखासारखं बिनधास्त बोलण्याचं धाडस क्वचितच बघायला मिळतं. 80च्या दशकात रेखा आणि अमिताभचं नाव नेहमीच जोडलं गेलं. असं म्हटलं गेलं की, रेखा स्वत:ला अमिताभची पत्नी मानत होती. हे तेव्हा आणखी गाजलं जेव्हा ती ऋषि कपूर आणि नीतू कपूरच्या लग्नात भांगेत कुंकू भरून आली होती.
आजही हा फोटो लोकांना आकर्षिक करतो. जेव्हा सिमी ग्रेवालने रेखाला अमिताभ बच्चन सोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा रेखा म्हणाली की, 'कुणीही त्यांच्यावर प्रेम करेल, मी काय वेगळी आहे? मी कधी याला नाकारलं आहे का? माझं त्यांच्यावर प्रेम नाही का? अर्थातच मी त्यांच्यावर प्रेम करते'.