Abhijeet Sawant : इंडियन आयडॉल अभिजीत सावंतचे 'ति'च्यासोबत खास क्षण, म्हणाला '१५ वर्ष..' By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 11:19 AM 2022-12-04T11:19:27+5:30 2022-12-04T11:31:39+5:30
२००४ चे वर्ष. इंडियन आयडॉल या रिएलिटी शोची सुरुवात झाली. आणि या शोमुळए एका रात्रीत स्टार झालेला मराठमोळा मुंबईकर विजेता अभिजीत सावंत. त्याचा मोहोब्बते लुटाऊॅंगा हा अल्बम प्रचंड गाजला होता. तर आज अभिजीत सावंतटच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याने पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. अभिजीत सावंतच्या पत्नीचे नाव शिल्पा एडवणकर सावंत असे आहे. अभिजीत आणि शिल्पाच्या लग्नाला आज १५ वर्ष पूर्ण झालेत.
यानिमित्ताने अभिजीतने बायकोसोबतचे खास फोटो शेअर केलेत. हे तर फक्त १५ वर्षच असे त्याने पोस्ट मध्ये म्हणले आहे.
इंडियन आयडॉलमुळे अभिजीत घराघरात पोहोचला. त्याचा आवाज आजही प्रेक्षकांना भुरळ घालतो. इंडियन आयडॉल मुळे त्याला कमालीची प्रसिद्धी मिळाली. मात्र यानंतर तो बॉलिवुडमध्ये म्हणावे तसे यश त्याला मिळाले नाही.
सध्या अभिजीत अनेक लाईव्ह शो, कॉन्सर्ट्स करतो. आजही रसिक त्याला भरभरुन प्रतिसाद देतात.
अभिजीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला आहे. आजही तो अगदी साधाच राहतो हे या फोटोंमधुन दिसुन येते.
इंडियन आयडॉल चा विजेता झाल्यानंतर अभिजीतवर मीडियाचे फार लक्ष होते. त्याच्याबद्दल अनेक बातम्या छापून येत होतेया. अनेक जण त्याला ट्रोलही करत होते.
इंडियन आयडॉल चा विजेला अभिजीत सावंत आता कुठे गायब आहे असे विचारण्यात येऊ लागले. यावर त्याने सांगितले की मी खुप छोट्या कुटुंबातून येतो. इंटस्ट्रीत स्वत:ची जागा मिळवणे फार अवघड आहे.
अभिजीतला दोन गोंडस मुली आहेत. सध्या तो त्याच्या कुटुंबासोबत खुश आहे आणि त्याचे गाण्याचे करिअरही नीट सुरु आहे.