Instagram rich list 2020 highest paid celebs priyanka chopra and virat kohli
Instagramवर सर्वाधिक कमाई करणारे ठरले प्रियंका चोप्रा-विराट कोहली, एका पोस्टमधून करतात कोट्यवधींची कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 05:23 PM2020-07-02T17:23:20+5:302020-07-02T17:23:20+5:30Join usJoin usNext सोशल मीडिया कंपनी हॉपर एचक्यू डॉट कॉमने इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणार्या स्टार्सच यादी जाहीर केली आहे. ही लिस्ट Instagram Rich List 2020 नावाने ओळखली जाते. देसी गर्ल प्रियंका चोप्रा इन्स्टाग्रामवर कमाईच्या बाबतीत मागे नाही. या यादीत प्रियंका 28व्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्राम रिच लिस्टबद्दल बोलायचे झाले तर भारतीय सेलेब्समध्ये विराट कोहली आणि प्रियांका चोप्राचे नाव याच सामील आहे. या यादीत विराट कोहली प्रियांका चोप्रापेक्षा पुढे आहे. विराट 26 व्या क्रमांकावर आहे. द रॉक म्हणजेच ड्वेन जॉनसन, एक इंस्टाग्राम पोस्ट टाकून 7.4 कोटी रुपये कमावते. द रॉक या यादीत पहिल्या नंबरवर आहे. प्रियंका चोप्रा 2020च्या इन्स्टाग्राम यादीमध्ये 28 व्या स्थानावर आहे. पण गेल्या वर्षी ती 19व्या क्रमांकावर होती. कमाईच्या बाबतीत प्रियांका 9 नंबरने खाली आली आहे. गेल्या वर्षी विराट कोहली 23 व्या स्थानावर होता, तर यावेळी तो 26 व्या स्थानावर आहे. मात्र, यावेळी तो इन्स्टाग्रामवर कमाईच्या बाबतीत प्रियांकाच्या पुढे आहे. प्रियांकाने तिच्या एका पोस्टवरून कोटींची कमाई करते हे स्पष्ट झाले आहे. प्रियंका ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहेटॅग्स :प्रियंका चोप्राविराट कोहलीPriyanka ChopraVirat Kohli