Jacqueline Fernandez चा हा बोल्ड अवतार पाहून फॅन्स झाले फिदा, बघतंच रहावं अशा ग्लॅमरस अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 05:00 PM2022-03-17T17:00:14+5:302022-03-17T17:11:13+5:30

Jacqueline Fernandez : वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलीन फर्नांडिसचे दोन सिनेमे एकापाठी एक रिलीज होणार आहेत. पहिला म्हणजे बच्चन पांडे १८ मार्चला रिलीज होतोय.

बॉलिवूडची अभिनेत्रत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चा फॅशन सेन्स फॅन्सला फारच आवडतो. तिचा प्रत्येक लूक फॅन्सवर जादू करत असतो. आता पुन्हा एकदा जॅकलीनने फॅन्सच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवर फॅन्सने लाइक्स पाऊस पाडला आहे.

फोटोंमध्ये जॅकलीन ब्राउन कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने कॅमेरासमोर तिचा परफेक्ट फिगर फारच चांगल्या प्रकारे फ्लॉंट केला आहे. तिचं मेकअप आणि तिची स्टाइलही कमाल आहे.

जॅकलीनने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याच्या कॅप्शनला तिने लिहिलं की, 'अटॅक'. 'अटॅक' हे तिच्या आगामी सिनेमाचं टायटल आहे. जॅकलीनच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'हॉटी'. दुसऱ्या एकाने लिहिलं, 'स्टनिंग'.

अशा शब्दात तिचे फॅन्स तिचं कौतुक करत आहे. जॅकलीनची तरूणांमध्ये किती क्रेझ आहे याचा अंदाज यावरून घेतला जाऊ शकतो की, केवळ २ तासातच तिच्या फोटोंना ७ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलीन फर्नांडिसचे दोन सिनेमे एकापाठी एक रिलीज होणार आहेत. पहिला म्हणजे बच्चन पांडे १८ मार्चला रिलीज होतोय. यात ती अक्षय कुमार, अरशद वारसी, क्रिती सेननसोबत दिसणार आहे. तर दुसरा सिनेमा आहे अटॅक. हा सिनेमा ११ एप्रिलला रिलीज होणार आहे. ज्यात ती जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.