Jacqueline Fernandez: टॉपलेस फोटोशूट, सलमानसोबत अफेअर अन् बरंच काही...चर्चेत आली जॅकलिन फर्नांडिस!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 11:33 AM2021-08-31T11:33:32+5:302021-08-31T11:41:44+5:30

Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेचा विषय बनली आहे. कालच तिची पाच ते सहा तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. जॅकलिन बॉलिवूडमध्ये नेमकी कशी आली? आणि ती याआधीही कोणकोणत्या गोष्टींमुळे चर्चेत आलेली ते पाहुयात...

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची काल ईडीकडून सहा तास चौकशी करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रकरणात तिचं नाव पुढे आलं आहे. पण याआधीही जॅकलिन विविध गोष्टींमुळे चर्चेचा विषय ठरली होती. मूळची श्रीलंकेची असलेली जॅकलिननं आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

२००९ साली 'अल्लादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली जॅकलिन श्रीलंकेची मॉडेल आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयानं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं असलं तरी तिनं सौंदर्यानं अनेकांना घायाळ केलं आहे. २००६ साली मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा बहुमान तिनं पटकावला होता.

'अल्लादीन'नंतर जॅकलिन मर्डर-२ चित्रपटात बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली आणि तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मर्डर-२ चित्रपट जॅकलिनसाठी पहिला व्यावसायिक क्षेत्रातील हिट चित्रपट ठरला. त्यानंतर तिनं हाऊसफुल-२, रेस-२, किक, जुडवा-२ इत्यादी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. सलमान खानसोबतचे चित्रपट जॅकलिनसाठी लकी ठरले. सलमानसोबत काम करण्याआधीच जॅकलिनला सर्व ओळखू लागले होते. पण सलमानसोबतची रोमँटिक कमेस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागली होती.

'किक' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी जॅकलिननं सलमानच्या गालावर किस केलं होतं. त्यानंतर जॅकलिन आणि सलमानच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. इतकंच नव्हे, तर जॅकलिन आणि सलमान दोघंही सलमानच्या बहिणीच्या घरी एकत्र राहत असल्याचंही वृत्त प्रकाशित झालं होतं. दोघांमधल्या अफेअरची चर्चा आजही होते.

२००८ साली जॅकलिनचं नाव रॉयल कुटुंबासोबत जोडलं गेलं. राजकुमार राशिद अल खलिफासोबत जॅकलिन डेटवर जात असल्याचं वृत्त समोर आलं होतं. दोघं एकमेकांना डेट करत असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली होती. दोघंही ३ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर दोघांचा काडीमोड झाल्याचंही सांगण्यात येतं.

त्यानंतर जॅकलिन दिग्दर्शक साजिद खानसोबतही रिलेशनशीपमध्ये असल्याचं वृत्त समोर आलं होतं. साजिदसोबत जॅकलिनचं नातं इतकं पुढे गेलं होतं की दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात होतं. पण हेही रिलेशनशीप २०१३ साली संपुष्टात आलं.

जॅकलिन त्यानंतर एकदा एका डान्स क्लबमध्ये एका अनोखळी व्यक्तीसोबत पाहायला मिळाली होती. या व्यक्तीनं जॅकलिनसाठी मुंबईतील पॉश परिसरात ३ बीएचके फ्लॅट देखील खरेदी करुन दिल्याची चर्चा आहे.

जॅकलिन पेटा म्हणजेच प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेशीही जोडली गेलेली आहे. प्राण्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या काळजीपोटी जॅकलिननं नेहमी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात तिनं मुंबईच्या महापौरांचीही भेट घेतली होती. यात तिनं घोडागाडी बंद करण्याची मागणी केली होती. त्यात जॅकलिनच्या मागणीला यशही आलं आणि मुंबईत घोडागाडीला बंदी घालण्यात आली.

जॅकलिननं केलेलं टॉपलेस फोटोशूट देखील चर्चेचा विषय ठरलं होतं. एका सोफ्यावर टॉपलेस फोटो शूट करुन ती चर्चेचं केंद्रस्थान बनली होती. त्यानंतर जॅकलिननं आणखी काही टॉपलेस फोटोशूट देखील केले. काही महिन्यांपूर्वी अशीही बातमी समोर आली होती की जॅकलिनं अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा जुहू स्थित आलिशान फ्लॅट भाड्यावर घेतला होता. जॅकलिननं ३ वर्षांसाठी प्रियांकाचं हे आलिशान घर दरमहा ६.७८ लाख रुपयांवर भाड्यावर घेतलं होतं.