janhvi kapoor family and childhood photos PSC
पाहा जान्हवी कपूरचे कुटुंबियांसोबतचे फोटो, लहानपणी देखील दिसायची तितकीच क्यूट By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 06:37 PM2020-03-06T18:37:17+5:302020-03-06T18:50:27+5:30Join usJoin usNext जान्हवी कपूरच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे तिच्या कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात. जान्हवी नेहमीच तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. जान्हवीचा आज वाढदिवस असून ती अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. तिने आईच्या पावलावर पाऊल ठेवत धडक या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर जान्हवी आणि खुशी या दोन्ही मुलींची काळजी खूपच चांगल्याप्रकारे घेतात. खुशी ही जान्हवीची लहान बहीण असून ती अनेक सार्वजनिक कार्यक्रमात बहिणीसोबत हजेरी लावते. श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर आणि बहीण अंशुला कपूर यांनी जान्हवी आणि खुशीला आधार दिला. बोनी कपूर यांचे आपल्या मुलांसोबतचे नाते एखाद्या मित्राप्रमाणे आहे. जान्हवीसोबत ते नेहमीच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावतात. जान्हवी प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि संजय कपूरची पुतणी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा हा फोटो कपूर कुटुंबियांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केला होता. टॅग्स :जान्हवी कपूरश्रीदेवीबोनी कपूरJanhavi KapoorSrideviBonnie Kapoor