ऑरेंज टी-शर्टसोबत शॉर्ट्समध्ये दिसली जान्हवी कपूर, बोल्ड अंदाजानं केलं घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 21:00 IST2019-03-23T21:00:00+5:302019-03-23T21:00:00+5:30

रेड कार्पेटवर आपल्या अदांनी जलवा दाखवणारी धडक फेम अभिनेत्री जान्हवी कपूरने बोल्ड अंदाजाने मुंबईतील जुहूमधील लोकांना घायाळ केले आहे. यादरम्यान जान्हवी ऑरेंज टीशर्टसोबत शॉर्ट्समध्ये दिसली.

शशांक खेतानचा चित्रपट धडकमधून जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता ती पीरिएड ड्रामा चित्रपट तख्तमध्ये दिसणार आहे.

करण जोहर दिग्दर्शित तख्तमध्ये जान्हवीसोबत भूमी पेडणेकर, करीना कपूर खान, आलिया भट, अनिल कपूर व विकी कौशल हे कलाकार दिसणार आहेत.

तख्त व्यतिरिक्त जान्हवी गुंजन सक्सेनाच्या जीवनावर बनत असलेला चित्रपट कारगिल गर्लमध्ये दिसणार आहे.

जान्हवी या चित्रपटात पहिली महिला IAF पायलट गुंजन सक्सेनाची भूमिका साकारताना दिसणार आहे.