OMG!! जॉन अब्राहमने रेस्टॉरंटमध्ये एकाचवेळी खाल्ल्या होत्या 64 चपात्या, पाहून वेटर म्हणाला... By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 06:04 PM 2022-03-28T18:04:14+5:30 2022-03-28T18:10:24+5:30
John Abraham :बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. फिटनेसच्या बाबतीत तो जराही तडतोड करत नाही. पण आधी असं नव्हतं. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. फिटनेसच्या बाबतीत तो जराही तडतोड करत नाही. पण आधी असं नव्हतं.
होय, आधी जॉनला खाण्यापिण्याची प्रचंड आवड होती. एकदा काय तर या पठ्ठ्यानं रेस्टॉरंटमध्ये 64 चपात्या खाल्ल्या होत्या. जॉनने ‘द कपिल शर्मा शो’ शोमध्ये हा खुलासा केला होता.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये जॉन त्याच्या ‘अटॅक’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही सुद्धा त्याच्यासोबत हजर होती.
जॉन व रकुल यांनी शोमध्ये धम्माल मज्जा केली. याचवेळी जॉनने 64 चपात्यांचा किस्साही सांगितला. तू एकदा रेस्टॉरंटमध्ये ६४ चपात्या खाल्ल्या होत्या ही अफवा खरी आहे का? असं कपिलने जॉनला विचारलं.
यावर हो, हो, हे खरं आहे आणि मी एकाचवेळी 64 चपात्या खाल्ल्या होत्या आणि हे पाहून वेटर हैराण झाला होता. अजून भात सुद्धा आहे, असं वेटर मला म्हणाला होता.
आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. जॉन फिटनेससाठी स्ट्रीक डाएट फॉलो करतो. काजू कतली ही मिठाई जॉनला प्रचंड आवडते. पण गेल्या 27 वर्षांपासून जॉनने काजू कतली खाल्लेली नाही.