Kajol-ajay lovestory: त्यानंतर मला कधीच तिला भेटायचं नव्हतं; अशी होती काजोल-अजयची पहिली भेट By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 11:46 AM 2022-02-24T11:46:31+5:30 2022-02-24T11:49:51+5:30
Kajol-ajay lovestory:२४ फेब्रुवारी रोजी या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. आज त्यांच्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कपल गोल ठरलेल्या या जोडीची नेमकी लव्हस्टोरी कशी असेल हा प्रश्न साऱ्यांना पडतो. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे काजोल आणि अजय देवगण. चित्रपटांप्रमाणेच ही जोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते.
२४ फेब्रुवारी रोजी या दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. आज त्यांच्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कपल गोल ठरलेल्या या जोडीची नेमकी लव्हस्टोरी कशी असेल हा प्रश्न साऱ्यांना पडतो. त्यामुळेच त्यांची लव्हस्टोरी आज जाणून घेऊयात.
एका इंटरव्ह्यूमध्ये काजोल आणि अजयने त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. हलचल या चित्रपटादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली. यावेळी काजोल मोठमोठ्याने बोलत होती आणि तिची ही पद्धत अजयला बिल्कूल पटली नव्हती.
पहिल्या भेटीत अजयला काजोल बिल्कूल आवडली नव्हती. परंतु, हळूहळू त्याच्या तिरस्काराचं रुपांतर प्रेमात झालं. खरं सांगायचं तर हलचलपूर्वी मी काजोलला एकदा भेटलो होतो. पण त्या भेटीनंतर मला पुन्हा तिला भेटायची इच्छा नव्हती. ज्यावेळी तुम्ही तिला पहिल्यांदा भेटता त्यावेळी ती खूप लाऊज, गर्विष्ठ आणि प्रचंड बोलणारी वाटते. आम्ही दोघंही व्यक्तीमत्त्वाच्या बाबतीत फार वेगळे आहोत. पण, मला वाटतं जे घडायचंय ते बरोबर घडतं, असं अजय म्हणाला.
ज्यावेळी काजोल आणि अजयची भेट झाली त्यावेळी ते दोघंही वेगवेगळ्या रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. या मैत्रीमध्ये अनेकदा काजोलने अजयकडून रिलेशनशीपच्या टीप्स घेतल्या होत्या.
काजोलचा ब्रेकअप झाल्यानंतर अजयनेच तिला सावरलं होतं. परंतु, हळूहळू ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी १९९९ मध्ये लग्न केलं.
हलचल या चित्रपटानंतर अजय आणि काजोल 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' आणि 'यू मी और हम' या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले.