'आयत्या घरात घरोबा'मधील 'कानन' आता दिसते अशी!, अभिनेत्रीचा पतीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेता By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 07:00 AM 2022-09-08T07:00:00+5:30 2022-09-08T07:00:00+5:30
Rajeshwari Sachdev: 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटातून सचिनची बहीण आणि लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका अर्थात ‘कानन’ ची भूमिका साकारली होती राजेश्वरी सचदेव या अभिनेत्रीने. नव्वदच्या दशकातील काळ मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी सुवर्णकाळ ठरला होता. सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हहा त्रिकुटाने त्यावेळी बॉक्सऑफिसावर धुमाकूळ घातला होता. अशाच चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे आयत्या घरात घरोबा.
सचिन पिळगावकर दिग्दर्शित आयत्या घरात घरोबा हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अशोक सराफ यांनी साकारलेला गोपुकाका’ प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता.
अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर, सुप्रिया, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, राजेश्वरी सचदेव, सुधीर जोशी, जयराम कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली होती.
आयत्या घरात घरोबा या चित्रपटातून सचिनची बहीण आणि लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका अर्थात ‘कानन’ ची भूमिका साकारली होती राजेश्वरी सचदेव या अभिनेत्रीने.
राजेश्वरी सचदेव ही थेटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना म्हणूनही ओळखली जात होती. मुंबईत एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या राजश्रीने “Indian people’s theatre association”(IPTA) जॉईन केले होते इथे अनेक नाटकांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.
“आयत्या घरात घरोबा” हा तिने साकारलेला पहिला वहिला मराठी चित्रपट. या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी ‘सुरज का सांतवा घोडा’ चित्रपटात तिला काम दिले.
सरदारी बेगम, हरी भरी, द फरगॉटन हिरो, वेलकम तू सज्जनपूर अशा बॉलिवूड चित्रपटातून ती झळकली. “हुल्ले हुल्लारे…” हे तिने गायलेले गाणे खूपच लोकप्रिय झालं होतं.
राजश्री सचदेवला खरी ओळख मिळाली ती झी टीव्ही वरील अंताक्षरीच्या शोमुळे. या शोचे सूत्रसंचालन राजेश्वरी आणि अनु कपूर यांनी केले होते. याच शोमुळे तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार देखील मिळाला होता.
अभिनेता वरूण वडोला याने अंतक्षरीच्या शोमध्ये पार्टीसिपेट केले होते तिथेच राजेश्वरीशी त्याची चांगली ओळख झाली. त्याच वर्षी दोघांनी एंगेजमेंट देखील केली. वरुण वडोला हा हिंदी मालिका अभिनेता म्हणून ओळखला जातो.
ये है मुंबई मेरी जान , कोशीश एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा अनेक दर्जेदार मालिकेतून कधी विनोदी भूमिका तर कधी चरित्र भूमिका त्याने साकारल्या आहेत.
नोव्हेंबर २००४ साली राजेश्वरी वरूण सोबत विवाहबद्ध झाली. त्यांना देवाज्ञ नावाचा एकुलता एक मुलगा आहे.
२०१८ साली राजेश्वरी पुन्हा एकदा मराठी सिनेइंडस्ट्रीकडे वळली. ती एक सांगायचंय या चित्रपटात झळकली होती.