'कॉफी विथ करण'मध्ये कपूर सिस्टर्स! जान्हवीचा बोल्ड तर खुशी कपूरचा ग्लॅमरस लूक, चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 07:53 PM2024-01-04T19:53:59+5:302024-01-04T20:04:06+5:30

जान्हवी कपूर आणि खुशी कपूर आपल्या हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतात.

जान्हवीने नुकतेच बहीण खुशी कपूरसह करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली.

जान्हवी आणि खुशी यांनी कॉफी विथ करणमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा केली. दिवंगत श्रीदेवी आणि साली बोनी कपूर यांच्या जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवी आणि खुशीने अभिनयाची वाट धरली.

यावेळी जान्हवी रेड कलरचा बॉडी फिट ड्रेसमध्ये दिसत आहे. या लूकला मॅचिंग रेड लिपस्टिक तिने लावली आहे.

'कॉफी विथ करण'मध्ये जान्हवीने श्रीदेवीच्या निधनाच्या धक्क्यातून कुटुंब कसं सावरलं याबाबतही भाष्य केलं.

याशिवाय जान्हवीने करणच्या शोमध्ये शिखरबाबतच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं. शिखरबरोबर ब्रेकअप केल्यानंतर काही व्यक्तींना डेट केल्याचंही सांगितलं. पण, कोणाबरोबरच न जमल्यामुळे जान्हवी आणि शिखर पुन्हा रिलेशनशिपमध्ये आले.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, ती शेवटची अभिनेता वरुण धवनसोबत ‘बवाल’ या चित्रपटात दिसली होती.

जान्हवी कपूरकडे आगामी काळात देखील अनेक चित्रपट आहेत. ती लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'देवरा' मध्ये दिसणार आहे.

आजपर्यंत काही चित्रपटात दमदार अभिनय करत तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. जान्हवी कपूरचे आज लाखो चाहते आहेत.

जान्हवीनंतर आता खुशीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. खुशीने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनयातील करिअरला सुरुवात केली आहे. दोघी बहिणींमध्ये खास बॉन्डिंग असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.