Karan Singh grover Bipasha basu romantic picture PSC
करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूचे हे रोमँटिक फोटो पाहून पडाल या कपलच्या प्रेमात By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 07:15 PM2020-03-02T19:15:23+5:302020-03-02T19:37:56+5:30Join usJoin usNext करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरने ३० एप्रिल २०१६मध्ये लग्न केले. बिपाशाचे हे पहिले तर करण सिंग ग्रोव्हरचे हे तिसरे लग्न आहे. करण आणि बिपाशा यांनी अलोन या चित्रपटात एकत्र काम केले होते. अलोन या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा आणि करण एकमेकांच्या प्रेमात पडले. करणचे पहिले लग्न श्रद्धा निगमसोबत दुसरे जेनिफर विंगेट आणि तिसरे लग्न बिपाशा बासूसोबत झाले आहे. त्याच्या तिन्ही पत्नी अभिनेत्री आहेत. करण आणि बिपाशा त्या दोघांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. बिपाशा बासू तिच्या अभिनयासोबतच तिच्या हॉट लूकसाठी ओळखली जाते. करण सिंग ग्रोव्हर हे छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध नाव असून त्याने अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. टॅग्स :करण सिंग ग्रोव्हरबिपाशा बासूKaran Singh GroverBipasha Basu