विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडीपीसी झाली होती करिना कपूर, मग कुटुंबानं केलं दोघांना वेगळं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 11:20 AM2023-07-05T11:20:37+5:302023-07-05T11:37:54+5:30

करीना कपूर खानचे नाव तिच्या करिअरच्या सुरुवातीला एका विवाहित अभिनेत्याशी जोडले गेले. रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण इतकं पुढं गेलं होतं की, अभिनेत्याच्या कुटुंबीयांना हस्तक्षेप करावा लागला होता.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल खास दाखवू शकला नाही, पण करिनाला एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. त्याच काळात करिनाने हृतिक रोशनसोबत अनेक चित्रपट केले.

'कभी खुशी कभी गम', 'मुझसे दोस्ती करोगे', 'मैं प्रेम की दीवानी हूं', 'यादीं' यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघे एकत्र दिसले होते. त्यांची केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडली.

करिना आणि हृतिक रोशन या जोडीने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले. अशात दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याचीही चर्चा सुरू होती.

करिना हृतिकसाठी वेडी झाली होती. प्रकरण इतके पुढे गेले होते की हृतिकच्या कुटुंबीयांना मध्ये पडून दोघांना वेगळं करावं लागलं होतं.

त्यावेळी करिनाने एका मुलाखतीत हृतिक रोशनसोबतच्या नात्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी अभिनेत्री रागात म्हणाली होती की, आता तिला अशाप्रकारच्या अफवांपासून ब्रेक हवा आहे.

करिना म्हणाली होती की, ती कधीही कोणत्याही विवाहित पुरूषाच्या प्रेमात पडलेली नाही आणि ती कधीही विवाहित पुरूषासोबत अफेअर करणार नाही.

करिना असंही म्हणाली होती की, विवाहित पुरूष तिच्या करिअरसाठी हानिकारक आहेत. तिला आणि हृतिकला निर्माते, दिग्दर्शक साइन करतात कारण ते एक हॉट जोडी आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडते.

करिना म्हणाली होती की, तिला चिंता आहे की, या अफवांचा प्रभाव हृतिक आणि सुझेनच्या वैवाहिक जीवनावर होऊ नये.

करिनाच्या या खुलाशानंतर तिच्या आणि हृतिकच्या अफेअरच्या अफवा बंद झाल्या होत्या. त्यानंतर दोघांनी सोबत कामही केलं नाही. दावा केला जातो की, या अफवांमुळेच तिने हृतिकसोबत काम करणं बंद केलं होतं.