Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 04:07 PM2024-10-18T16:07:49+5:302024-10-18T16:27:01+5:30

Kareena Kapoor : करीना शाहिद किंवा सैफसाठी नव्हे तर एका सुपरस्टारसाठी वेडी होती आणि तिने त्याचे पोस्टर चक्क तिच्या बाथरूममध्ये देखील लावले होते.

करीना कपूर ही बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने ही अभिनेत्री लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

करीना कपूरही तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केलं. सैफची पत्नी होण्यापूर्वी करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा रंगली होती.

करीना शाहिद किंवा सैफसाठी नव्हे तर एका सुपरस्टारसाठी वेडी होती आणि तिने त्याचे पोस्टर चक्क तिच्या बाथरूममध्ये देखील लावले होते. करीना कपूरने ज्या अभिनेत्यासाठी वेडी झाली होती तो अभिनेता म्हणजे सलमान खान.

गेम शो दस का दमच्या एका एपिसोडदरम्यान सलमानने करीनाबद्दलचा एक मजेशीर किस्सा शेअर केला होता.

सलमान खानने सांगितलं होतं की, जेव्हा त्याने 'मैने प्यार किया' मधून स्टारडम मिळवलं आणि तो 'निश्चय' चित्रपटात करिश्मा कपूरसोबत काम करत होता, तेव्हा अभिनेत्रीने त्याला सांगितलेलं की तिची बहीण करीनाने तिच्या बाथरूममध्ये त्याचे पोस्टर लावले आहेत.

करिश्मा कपूरने हे सांगताच सलमान खान खूप खूश झाला होता. सलमानने पुढे खुलासा केला होता की, "काही महिन्यांनंतर आशिकी नावाचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला."

"माझं पोस्टर तेव्हा केवळ काढण्यात आलं नाही, तर ते फाडून त्याऐवजी राहुल रॉयचं पोस्टर लावण्यात आलं." सलमानला याबद्दल करिश्मा कपूरनेच माहिती दिली होती.

करिश्मा कपूर म्हणाली, "सलमान, आता बाथरूममध्ये तुझं पोस्टर नाही, आता तिथे राहुल रॉय आहे." सलमानने हे सांगताना करिश्माची नक्कलही केली, ज्यावर करिश्माने "वाह, सलमानच्या हे लक्षात आहे" असं उत्तर दिलं होतं.

सलमान खाननेही करिश्मा कपूरसोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या दोघांनी अंदाज अपना अपना, दुल्हन हम ले जाएंगे आणि बीवी नंबर 1 सारख्या अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

सलमान खानने करिश्मा कपूरची धाकटी बहीण करीना कपूरसोबतही ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. करिनासोबत बजरंगी भाईजान आणि बॉडीगार्डसारखे सुपर-डुपर हिट चित्रपट दिले होते. मैं और मिसेस खन्ना चित्रपटातही ही जोडी दिसली होती.