Kareena Kapoor Khan : १४ वर्षांपूर्वीची बेबो! करिनाचे 'या' सिनेमाच्या लुकटेस्टचे Photo सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 01:44 PM2023-02-26T13:44:14+5:302023-02-26T13:52:20+5:30

नेहमी ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या करिना कपूरच्या या फोटोंवर चाहत्यांचा विश्वासच बसणार नाही.

'बेबो' म्हणजेच करिना कपूर खान नेहमीच ग्लॅमरस लुकमध्ये बघायला मिळते. नवाब सैफ अली खानची बेगम कायम ब्रॅंडेड कपड्यांमध्ये दिसते.

करिनाने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या कित्येक भूमिका गाजल्या आहेत. नुकतेच '3 इडियट्स' सिनेमातील तिच्या लुक टेस्टचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

2009 मध्ये आलेल्या '३ इडियट्स' सिनेमात करिनाने डॉ पियाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिच्यासाठी काही लुक शॉर्टलिस्ट केले गेले होते. त्याच वेगवेगळ्या लुकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एका फोटोत तर करिनाचा बॉयकट दिसत आहे. कलरफुल कुर्त्यात तिचा हा फोटो दिसून येतोय. शॉर्ट हेअरमध्ये करिना कॉलेजवयीन तरुणी दिसत आहे.

तर आणखी एका फोटोत ती सोज्वळ लुकमध्ये दिसत आहे. बांधलेले केस, हिरव्या रंगाचा कुर्ता, लोंबते कानातले, नोज रिंग असा तिचा एकंदर लुक आहे. यातही ती सुंदर दिसत आहे.

याच सिरीजमधील एका फोटोने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.हातात त्याच रंगाच्या बांगड्या आहेत तर सोन्याचे दागदागिने घातले आहेत.चष्माही लावला आहे. करिनाचा हा लुकही पसंत केला जातोय.

याशिवाय एका फोटोत करिनाचा साधा लुक दिसतोय. गुलाबी रंगाचा टॉप, गळ्यात स्टोल, हातात ब्रेसलेट आणि तिने महाविद्यालयीन तरुणींप्रमाणे साईड बॅग घेतलेली आहे. यामध्येही करिनाचे सौंदर्य खुलून आले आहे.

शेवटच्या फोटोत करिनाने लाल रंगाचे हेल्मेट लावले आहे. सिनेमात शेवटी स्कुटर चालवत हेल्मेट घातल्याचा एक आयकॉनिक सीन आहे. याच सीनसाठी हा लुक टेस्ट घेतला गेल्याचं दिसतंय.

दिग्दर्शक निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी तब्बल १४ वर्षांनंतर हे फोटो पोस्ट केले आहेत. 3 इंडियट्समधील पिया या भूमिकेसाठी करिनाचे लुक टेस्च असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे.