करिना कपूर खान देणार जुळ्या मुलांना जन्म?, फोटो पाहून चाहत्यांनीच लावला अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:10 PM 2021-01-08T17:10:35+5:30 2021-01-08T17:17:13+5:30
करिना तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. अर्थात या दिवसांत आराम करण्याऐवजी बेबो काम करतेय. मात्र वजन वाढल्याने आता तिला चालणे फिरणे कठीण झाले आहे. नुकतीच करिना तिच्या घराबाहेर दिसली. या दरम्यान नेहमीप्रमाणे मीडियाच्या कॅमे-यात ती कैद झाली. सध्या ती प्रेग्नंसी एन्जॉय करत असून लवकरच बाळाला जन्म देणार आहे.
ककरिनाच्या बेबी बंपला पाहून हे स्पष्ट झाले आहे की करीना तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे.
काम करण्यासोबत करिना तिच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबतही एन्जॉय करतेय.
अशा परिस्थितीत सोशल मीडियावरील तिचे चाहते करीना जुळ्या मुलांना जन्म देणार आहे की काय अशीच चर्चा पाहायला मिळत आहे.
करिना कपूर प्रेग्नंट असल्यापासून तुफान चर्चेत असते. तिची मॅटर्निटी स्टाइलनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
अलीकडे एका मुलाखतीत बेबो तिच्या दुस-या प्रेग्नंसीवर बोलताना दिसली होती. अशी कोणती गोष्ट आहे, जी दुस-या प्रेग्नंसीत तुला करायची नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.
यावर मला खूप जास्त वजन वाढवायचे नाही, असे ती म्हणाली होती.
तैमूरच्यावेळी प्रेग्नंट असताना मला सर्वांनी खूप खाण्याचा सल्ला दिला होता आणि मी नुसते खात सुटले होते.
यामुळे माझे वजन 25 किलो वाढले होते. आता मला पुन्हा असे करायचे नाही.
मला फक्त हेल्दी व फिट राहायचे आहे, असे ती म्हणाली होती.