Kareena Kapoor was dancing on Bol Chudiya song
बॉलिवूडची बेबो करीना कपूर थिरकली 'बोल चुडिया...' गाण्यावर, पहा हे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:19 PM2018-11-21T18:19:37+5:302018-11-21T18:22:56+5:30Join usJoin usNext करीना कपूरचा पहिला रेडिओ शोचे नुकतेच अनावरण पार पडले. यावेळी बोल्ड व डॅशिंग अंदाजात पाहायला मिळाली. यावेळी करीनाने महिलांची सुरक्षा व महिला सक्षमीकरणावर आपले मत व्यक्त केले व महिलांचे कौतूकही केले. या कार्यक्रमात करीनाने 'कभी खुश कभी गम' सिनेमातील 'बोल चुडियां...' या गाण्यावर ठुमके लगावले. करीना कपूर आगामी चित्रपट 'कलंक'साठी खूप मेहनत करते आहे. नुकतीच करीना 'वीरे दी वेडिंग' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात करीनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत होत्या. करीना या आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात करीना म्हणाली की, 'प्रत्येक महिलेची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही की तुम्ही मोठ्या स्टार आहात. फक्त सुरक्षित असले पाहिजे.'टॅग्स :करिना कपूरKareena Kapoor