करीना, ऐश्वर्याला सोडा अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीच्या एंगेजमेंट रिंगची किंमत ऐकून व्हाल हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:56 PM 2021-05-21T19:56:55+5:30 2021-05-21T20:04:24+5:30
बॉलिवूड अभिनेत्री नेहमी महागड्या रिंग्स फ्लॉन्ट करताना दिसतात. आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या पार्टनरने त्यांना महागड्या रिंग्स देऊन लग्नासाठी प्रपोझ केले होते. बॉलिवूड अभिनेत्री नेहमी महागड्या रिंग्स फ्लॉन्ट करताना दिसतात. आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या पार्टनरने त्यांना महागड्या रिंग्स देऊन लग्नासाठी प्रपोझ केले होते.
लग्नात सर्वात महागडी रिंग अभिनेत्री आसिनला मिळाली आहे. असिनने २०१६ रोजी बिझनेसमन राहुल शर्मासोबत लग्न केले होते. या रिंगची किंमत जवळपास ६ कोटी इतकी आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडेही कोटींची रिंग आहे. ती देखील बऱ्याचदा रिंग दाखवताना दिसते. राज कुंद्राने लग्नाच्या वेळी शिल्पाला २० कॅरेटची रिंग दिली होती. ज्याची किंमत तीन कोटी इतकी आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने २०१८ साली रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. या लग्नाची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. दीपिकाच्या या एंगेजमेंट रिंगची किंमत २.५ कोटी इतकी आहे.
प्रियंका चोप्राने निक जोनास सोबत लग्न केले. नेहमी प्रियंका तिची एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसते. तिच्या या रिंगची किंमत २.१ कोटी इतकी आहे.
२०१७ साली अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले. अनुष्काच्या रिंगची किंमत १ कोटी रुपये इतकी आहे.
अभिनेत्री सोनम कपूरने दिल्लीत बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले आहे. तिच्या रिंगची किंमत ९० लाख इतकी आहे.
२०१२ मध्ये सैफ अली खान आणि करीना कपूरने लग्न केले. सैफने करीनाला जी अंगठी घातली ती ७५ लाखांची आहे.
२००७मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने लग्न केले. ऐश्वर्या नेहमी एंगेजमेंट रिंग घालते. या रिंगची किंमत ५० लाख रुपये आहे.