घरोघरी मातीच्या चुली ! गरोदरपणात सासूने केला होता छळ; करिश्मा कपूरनेही भोगलाय कौटुंबिक हिंसाचार By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:41 PM 2022-12-22T15:41:12+5:30 2022-12-22T15:48:33+5:30
निळ्या डोळ्यांची अभिनेत्री करिश्मा कपूरची (Karishma Kapoor) जादू आजही कायम आहे. ९० च्या तिने अनेक सुपरहिट चित्रपट केले. गोविंदा, सलमान खान यांच्यासोबत तिची जोडी तुफान गाजली. मात्र करिश्माने खऱ्या आयुष्यात बरंच काही सहन केलं आहे हे खूप कमी जणांना माहितीए व्यावसायिक संजय कपूर (Sanjay kapoor) सोबत करिश्माने २००६ मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नातून करिश्माला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे.
मात्र लग्नाच्या १३ वर्षांनी २०१६ मध्ये दोघेही विभक्त झाले.
करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप केले आहेत पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.
करिश्मा गरोदर असताना सासूने तिचा छळ केल्याचं तिने याचिकेत म्हणलं आहे.
करिश्मा गरोदर असताना संजयने तिच्यासाठी एक ड्रेस आणला. मात्र तो ड्रेस तिला चांगला दिसत नसल्याचे बघून संजय चिडला.
संजयने त्याच्या आईला करिश्माच्या कानाखाली मारायले सांगितले. लग्नाच्या काही वर्षातच असा छळ होऊ लागल्याने करिश्माने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे करिश्मा आणि अभिषेक बच्चन यांचे आधी लग्न ठरले होते. साखरपुडाही झाला होता मात्र काही कारणाने हे लग्न मोडले.
करिश्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने दुसरे लग्न केले. तर करिश्मा आजही एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.