‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात कार्तिक-साराचे हातात हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 19:48 IST2018-12-20T15:17:22+5:302018-12-20T19:48:47+5:30

मुंबईत रंगलेल्या ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात ‘सिम्बा’ रणवीर सिंगने त्याची को-स्टार सारा अली खानची एक इच्छा पूर्ण केली. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. योगायोगाने काल ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’मध्ये कार्तिक व सारा दोघेही आलेत आणि रणवीरने नेमकी हीच संधी साधत दोघांचीही भेट घडवून आणली. नुसतीच भेट नाही तर दोघांचेही हात एकमेकांच्या हातात देत, सारा व कार्तिकची जाम मजा घेतली.