SEE PICS : कतरिना कैफसारखी दिसणारी ही बाला आहे तरी कोण? साईन केलेत दोन सिनेमे
By रूपाली मुधोळकर | Updated: November 17, 2020 08:00 IST2020-11-17T08:00:00+5:302020-11-17T08:00:02+5:30
होय, ती हुबेहुब कतरिना कैफसारखी दिसते.

सोशल मीडिया स्टार आणि मॉडेल अलिना राय सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचा लूक
होय, अलिना हुबेहुब कतरिना कैफसारखी दिसते. कतरिनाची हिच डुप्लिकेट आता चित्रपटातही झळकणार आहे.
अलिना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती, ‘कमाल’ या बादशाहच्या म्युझिक व्हिडीओमुळे.
गतवर्षी रिलीज झालेल्या या व्हिडीओमुळे अलिनाचा चेहरा अचानक प्रकाशझोतात आला होता.
अलिना मुंबईला आली तेव्हा तिची सर्रास कॅटसोबत तुलना केली जायची. अलिना लोकांच्या या भावना कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायची.
आज मात्र तिला स्वत:ची ओळख महत्त्वाची वाटते. कॅटची डुप्लिकेट म्हणून नव्हे तर अलिना म्हणूनच लोकांनी तिला ओळखावे, असे तिला वाटते.
अलिनाकडे सध्या ‘सॉरी, आय एम लेट’ आणि ‘लखनौ जंक्शन’ हे सिनेमे आहेत.
‘लखनौ जंक्शन’ या सिनेमात अलिना जर्नालिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘सॉरी, आय एम लेट’ या सिनेमात ती मिथुनचा मुलगा महाअक्षयसोबत दिसणार आहे.