PICS: कतरिना कैफने मंगळसूत्र फ्लॉन्ट करत शेअर केले PICS, फोटोत दिसलं नवं घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:22 PM2022-01-04T16:22:14+5:302022-01-04T16:52:46+5:30

विकी कौशल आणि कतरिना कैफ(Katrina kaif )लग्नानंतर आता त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. त्यांच्या सी-फेसिंग घराची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली. आता तिने लग्नानंतरचा पहिला घरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये घर आणि हार्टची इमोजी टाकून त्यावर होम स्वीट होम असे लिहिले आहे.(Instagram)

. या फोटोंमध्ये कतरिना कैफ मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे, कतरिना कैफ फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.: (Instagram)

या फोटोंमध्ये कतरिना कैफने कार्डिगन आणि शॉर्ट्स घातली आहेत. तसेच, कतरिना कैफही या फोटोंमध्ये तिचे मंगळसूत्र फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटोंमध्ये कतरिना कैफने गळ्यात हिऱ्याचे मंगळसूत्र घातले आहे. (Instagram)

कतरिना कैफ आणि विकी त्यांच्या लग्नापासून सतत चर्चेत असतात. दोघेही नुकतेच विमानतळावर स्पॉट झाले. विकी कौशलला एअरपोर्टवर सोडण्यासाठी कॅट आली होती. कारमधून उतरण्यापूर्वी विकीने कतरिनाला मिठी मारली आणि तिला kiss केलं होतं. (Instagram)

ख्रिसमसच्या दिवशी देखील, या कपलने चाहत्यांसह एक सुंदर फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी 'मेरी ख्रिसमस' लिहिले. (Instagram)

लग्नानंतर कतरिनाने नव्या घरात स्वीट डिश म्हणून शीरा बनवला होता. ज्याचा फोटो तिने इन्स्टा स्टोरीवर शेअर केला होता. (Instagram)

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. (Instagram)

दोघांच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. (Instagram)