कतरिना कैफची आई दिसते तिच्या इतकीच खूप सुंदर, पाहा विकी कौशलच्या सासूबाईंचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:27 PM2022-06-03T13:27:21+5:302022-06-03T14:00:30+5:30

Katrina Kaif : कतरिना कैफच्या आईला तुम्ही पाहिलंत का? कतरिनाची आई तिच्यासारखीच खूप सुंदर दिसते.

बॉलिवूडमधील क्युट कपल कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) त्यांच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहेत. लग्न झाल्यापासून या दोघांच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.

कतरिना तिच्या सासरच्या मंडळींना तसेच आई-वडिलांना पूर्ण वेळ देते. कतरिना कैफच्या आईला तुम्ही पाहिलंत का? कतरिनाची आई तिच्यासारखीच खूप सुंदर दिसते.

कतरिना कैफचा जन्म १६ जुलै १९८३ रोजी हाँगकाँगमध्ये झाला आहे. पण कतरिना कैफचे वडील भारतीय आहेत.

ते मूळचे काश्मीरचे आहेत. त्यांचे नाव आहे मोहम्मद कैफ.

तर कतरिनाची आई सुजैन टरकोट ही ब्रिटिश नागरिक आहे. कतरिना कैफचे वडील तिच्या आईला ब्रिटनमध्ये भेटले आणि दोघांनीही आपले कुटुंब तिथेच स्थायिक केले. परंतु काही वर्षांतच दोघांचा घटस्फोट झाला.

कतरिनाच्या कुटुंबात तिला ६ बहिणी आणि एक भाऊ असून कतरिनासह ८ भावंडे आहेत. कतरिना तिच्या भावंडांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, इतर तीन बहिणी तिच्यापेक्षा लहान आहेत.

इतकं मोठं कुटुंब असलेल्या कतरिनाने लहान वयातच काम करायला सुरुवात केली. तिची एक बहीण इसाबेल कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

कतरिनाला तिच्या आयुष्यात वडिलांची कमतरता जाणवते.

ती एकदा एका मुलाखतीत म्हणाली होती, "माझ्या वडिलांचा आमच्या संगोपनावर, आमच्या धार्मिक, सामाजिक किंवा नैतिक वर्तनावर कोणताही प्रभाव नाही.

कतरिना खूप लहान होती जेव्हा तिचे वडील कुटुंब सोडून गेले. वडिलांचे प्रेम आपल्याला कधीच मिळाले नाही, याची तिला नेहमीच खंत वाटते.