KGF Chapter 2: ‘केजीएफ 2’साठी सुपरस्टार यशने किती फी घेतली माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 12:00 PM2022-04-03T12:00:46+5:302022-04-03T12:16:46+5:30

KGF Chapter 2: होय, ‘केजीएफ 1’ सुपरडुपर हिट झाला होता. त्याचाच दुसरा पार्ट ‘केजीएफ 2’ येतोय म्हटल्यावर यशचं मानधन सुद्धा दुप्पट झालं आहे.

प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ 2’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. साहजिकच फॅन्स क्रेझी झाले आहेत.

साऊथ सुपरस्टार यश अर्थात रॉकी भाईला पाहण्यास चाहते आतूर आहेत. सध्या ‘केजीएफ 2’ची अख्खी टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

यशसोबत संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज, श्रीनिधी शेट्टी असे बडे स्टारही या चित्रपटात आहेत. त्यामुळे चित्रपटाची जोरदार हवा आहे.

तूर्तास चर्चा आहे ती ‘केजीएफ 2’ साठी यशने घेतलेल्या फीची. या चित्रपटासाठी यशने किती फी घेतली माहितीये? तर डबल.

होय, ‘केजीएफ 1’ सुपरडुपर हिट झाला होता. त्याचाच दुसरा पार्ट ‘केजीएफ 2’ येतोय म्हटल्यावर यशचं मानधन सुद्धा दुप्पट झालं आहे.

पहिल्या पार्टसाठी यशने 15 कोटी फी घेतली होती. शिवाय नफ्यातील काही वाटा देखील घेतला होता.

दुस-या पार्टसाठी म्हणजेच ‘केजीएफ 2’ साठी यशने 30 कोटी फी घेतली आहे. शिवाय नफ्यातील काही भागही तो घेणार आहे.

या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Dutt)आणि रवीना टंडन (Raveena Tandon) हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तने या सिनेमात अधीराची भूमिका साकारली आहे. संजयने या चित्रपटासाठी 9 ते 10 कोटी मानधन घेतल्याचं कळतंय.

रवीना टंडन या चित्रपटात रमिका सेनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने 1- 2 कोटी रूपये फी घेतल्याचं कळतंय.

साऊथ व हिंदी सिनेमात झळकलेले ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज ‘केजीएफ चॅप्टर 2’मध्ये विजयेंद्र इंगलागीची भूमिका साकारत आहेत. त्यांनी यासाठी 80-82 लाख रूपये मानधन घेतल्याचे कळतंय.