ठाणे जिल्ह्यात आहे ललित प्रभाकरचं घर; कल्याणजवळच्या या शहरात झालाय लहानाचा मोठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 13:37 IST2024-01-23T13:24:19+5:302024-01-23T13:37:00+5:30

Lalit prabhakar: तुम्हाला माहितीये का ललित प्रभाकरचं घर नेमकं कुठेय?

मराठी कलाविश्वातील हँडसम हंक म्हणजे ललित प्रभाकर. रंगभूमी, मालिका आणि सिनेमा असा प्रवास करत ललितने लोकप्रियता मिळवली.

ललित कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्याची वरचेवर चर्चा रंगत असते.

ललित कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

तरुणींमध्ये ललितची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

आज ललितविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. तो कुठे राहतो, त्याचं खरं नाव काय हे पाहुयात.

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून ललित खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला. ललितचं खरं नाव ललित प्रभाकर भदाणे असं आहे.

ललित नेमका कुठे राहतो, त्याचं मूळगाव कोणतं असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.

ललित मूळचा ठाणे जिल्ह्यातील आहे. कल्याणनजीक असलेल्या उल्हासनगर येथे तो लहानाचा मोठा झाला आहे.