बच्चन कुटुंबातही आहे गरीब व्यक्ती; अभिषेक नव्हे तर 'या' व्यक्तीची संपत्ती आहे सगळ्यात कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 03:26 PM2024-01-16T15:26:19+5:302024-01-16T15:31:15+5:30

Bachchan family:अभिषेक, श्वेता आणि ऐश्वर्यामध्ये कोण आहे सगळ्यात श्रीमंत?

अमिताभ बच्चन- बच्चन कुटुंबाचा कणा म्हणजे अमिताभ बच्चन. सात हिंदुस्तानी या सिनेमातून करिअरची सुरुवात करणाऱ्या अमिताभ आजही कलाविश्वात सक्रीय आहेत. वयाची ८१ व्या वर्षी इंडस्ट्रीत सक्रीयपणे काम करणारे बिग बी सध्याच्या घडीला एका सिनेमासाठी ६ कोटी रुपये मानधन घेतात. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, बिग बींचं नेटवर्थ ३ हजार १९० कोटी रुपये इतकं आहे.

जया बच्चन- बिग बींची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांचं नाव संपत्तीच्या यादीत तिसऱ्या स्थानावर येतं. कारण, त्यांचं नेटवर्थ ६४० कोटी रुपये इतकं आहे. अलिकडेच त्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात झळकल्या होत्या.

ऐश्वर्या राय-बच्चन- बिग बींची सून ऐश्वर्या राय हिचं नाव संपत्तीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर येतं. रिपोर्टनुसार, ऐश्वर्याचं नेटवर्थ ७७६ कोटी रुपये इतकं आहे. ऐश्वर्या सिनेमांसह ब्रँड शूटमधूनही कमाई करते.

श्वेता बच्चन – अमिताभ बच्चन यांचं त्यांच्या लेकीवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे अलिकडेच त्यांनी त्यांचा एक आलिशान बंगला तिच्या नावावर केला. श्वेताचा नवरा एक प्रसिद्ध उद्योजक आहे. तर श्वेताही काही जाहिरातींमध्ये दिसून येते. श्वेताचं नेटवर्थ ६० कोटी रुपये इतकं आहे.

नव्या नवेली नंदा – अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेताची लेक नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे तिची कायम चर्चा रंगत असते. तिचं नेटवर्थ १५ कोटी रुपये आहे.

अभिषेक बच्चन – अभिषेकच्या करिअरविषयी फारसं कोणाला सांगायची गरज नाही. अभिषेक फार मोजक्या सिनेमांमध्ये झळकला आहे. परंतु, तो प्रो कबड्डी टीम, फूटबॉल टीम आणि अन्य ब्रँड्सच्या जाहिराती करुन पैसे कमावतो. अभिषेकचं नेटवर्थ २१२ कोटी रुपये आहे.

अगस्त्य नंदा – श्वेताचा धाकटा लेक अगस्त्य याने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘द आर्चिज’ या चित्रपटात तो अलिकडेच झळकला. अगस्त्यने नुकतीच त्याच्या करिअरला सुरुवात केल्यामुळे त्याची संपत्ती सुद्धा कमी आहे. रिपोर्टनुसार, अगस्त्यचं नेटवर्थ २ कोटी रुपये इतकं आहे.