'कुछ कुछ होता है' सिनेमाची 'अंजली' आता दिसते इतकी ग्लॅमरस,सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर By सुवर्णा जैन | Published: September 22, 2020 03:42 PM 2020-09-22T15:42:46+5:30 2020-09-22T15:55:57+5:30
'कुछ कुछ होता है' रातोरात प्रसिद्ध झालेली बालकलाकार म्हणजे सना सईद. याच सिनेमामुळे सना देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली. शाहरुखच्या मुलीची भूमिकेत ती झळकली होती.अंजली भूमिकेला रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. ही भूमिका जास्त मोठी नसली तरी छोट्या अंजलीला आजही रसिक विसरलेले नाहीत. तिचे आत्ताचे ग्लॅमरस फोटो पाहून तिच छोटी अंजली आजही आठवते.
'कुछ कुछ होता है' नंतर सना 'हर दिल जो प्यार करेगा' आणि 'बादल' सिनेमातही बालकलाकार म्हणून झळकली होती.
या सिनेमानंतर सना अचानक गायब झाली.
काही वर्षा पर्यंत तिने कोणत्याच सिनेमात भूमिका साकारली नव्हती. दरम्यानच्या काळात शिक्षणावरच तिने तिचे लक्ष केंद्रित केले होते.
काही वर्ष अभिनयातून ब्रेक घेतलेल्या सनाने 2008 मध्ये 'बाबुल का आंगन छूटे न' आणि 'लो हो गई पूजा इस घर की' टीवी मालिकेतून कमबॅक केले.
टीव्ही मालिकेतील तिच्या भूमिकेलाही रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती.
त्यानंतर रियलिटी शो 'झलक दिखला जा 6', 'झलक दिखला जा 7', 'नच बलिए 7' आणि 'झलक दिखना जा 9' मध्ये सहभागी होत तिने आपल्या डान्सिंग स्टाईलनेही रसिकांची पसंती मिळवली.
छोटा पडदा गाजवल्यानंतर पुन्हा एकदा सनाने २०१२ मध्ये रूपेरी पडद्यावर जोरदार एंट्री केली. करण जोहरचा सिनेमा 'स्टुंडेंटऑफ द इअर' मध्ये ती झळकली.
सिनेमात वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका होत्या. मात्र या सगळ्यांमध्ये सना तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत राहिली.
यानंतर तिच्या वाट्याला फारशा चांगल्या भूमिका आल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा सना बॉलिवूडपासून काहीशी दूर गेली.
सध्या ती केवळ सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. नवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते.