कूल लुकमध्ये ललित प्रभाकर वेधतोय तरुणींचं लक्ष; फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:44 IST2022-03-11T13:03:25+5:302022-03-11T13:44:12+5:30

ललित प्रभाकरच्या फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती. पाहा त्याचा कूल लूक

ललित हा एक गुणी अभिनेता आहे रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ललित हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

सध्या ललित प्रभाकरनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक चाहत्यांना त्याचा हा नवा फोटोशूट खुपच पसंतीस पडतोय.

पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि पँटमध्ये केलेलं फोटोशूट त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलंय. त्याचा या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. त्याच्या फोटोंना हजारो लाईक्सही मिळाले आहेत.

या फोटोंमध्ये ललित खुप हँडसमही दिसतोय. सुपर हँडसम, हार्ट इमोजी पोस्ट करत ललितच्या चाहत्यांनी त्याच्या फोटोवर कमेंट्सही केल्या आहेत.

ललित प्रभाकरनं मराठी मालिकेतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय हंपी, आनंदी गोपाळ, राजवाडे अँड सन्स आणि नुकताच प्रदर्शित झालेला झोम्बिवली या सिनेमातील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या. (सर्व फोटो- ललित प्रभाकर, इन्स्टाग्राम)