Lock Upp: अभिनेता करणवीर बोहरावर कर्जाचा डोंगर; म्हणाला, मी कर्जबाजारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 17:24 IST2022-03-15T17:17:18+5:302022-03-15T17:24:57+5:30
Lock Upp, Karanvir Bohra: कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये रोज नवे खुलासे होत आहेत.आता टीव्ही अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल शॉकिंग खुलासा केला आहे.

कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये रोज नवे खुलासे होत आहेत. आता टीव्ही अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल शॉकिंग खुलासा केला आहे.
‘लॉकअप’मधील अन्य कैद्यांसोबत गप्पा मारत असताना करणवीर त्याच्या करिअरबद्दल बोलला.
गेल्या 7 वर्षांत मी माझ्या करिअरमध्ये काहीही चांगलं करू शकलो नाहीये. मी डोक्याच्या केसापासून तळपायाच्या नखापर्यंत कर्जात बुडालो आहे, असं तो म्हणाला.
लोकांची देणी न दिल्यामुळे माझ्याविरोधात 3-4 केसेसही सुरू आहेत. मी अक्षरश: कर्जाच्या डोंगराखाली दबलो आहे, इच्छा असूनही मला बाहेर निघता येत नाहीये, असं तो म्हणाला.
2015 पासून मी जितकं काम केलं, जितका पैसा कमावला, तो कर्ज फेडण्यात गेला, असा खुलासाही त्याने केला.
मी स्वत:साठी आणि माझ्या कुटुंबासाठी दु:खी आहे. शेवटी मी माझ्या कुटुंबाला काय देतोय? माझ्याजागी दुसरा कोणी असता तर आत्तापर्यंत त्याने आत्महत्या केली असती, असंही तो म्हणाला.
हा (लॉकअप)शो माझ्यासाठी लाईफ लाईन आहे. माझ्या करिअरसाठी लाईफलाईन आहे, असंही तो म्हणाला.
करणवीर बोहराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. क्योंकि सास भी कभी बहू थी, क्या हादसा क्या हकीकत, कुसुम, शरारत, कसौटी जिंदगी की, पिया के घर जाना है, कुमकुम भाग्य, नागीन 2 अशा अनेक मालिकांमध्ये तो झळकला.