बॉलिवूडचा 'सिम्बा' रणवीरचा सळसळता उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 16:15 IST2018-12-20T15:30:50+5:302018-12-20T16:15:21+5:30

आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता रणवीर सिंगला लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

2010 मध्ये बॉक्सऑफिसवर रिलीज झालेल्या 'बँड बाजा बारात' सिनेमातून रणवीर सिंहनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

आपल्या पदार्पणातच रणवीर सिंह फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

बॉलिवूडमधील अतिशय Energetic हीरो म्हणून रणवीर सिंहची ख्याती आहे.

अभिनयासोबतच तो एक उत्कृष्ट डान्सरदेखील आहे.

14 नोव्हेंबर 2018 रोजी रणवीर सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण विवाह बंधनात अडकले.

राम लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत रणवीर सिंहचे हे तीन सिनेमे प्रचंड गाजले आहेत.

रणवीर सिंहचा आगामी सिनेमा 'सिम्बा' 28 डिसेंबरला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

सिम्बा सिनेमामध्ये सारा अली खानचीही महत्त्वाची भूमिका आहे