Lokmat Most Stylish Awards 2018 : रणवीर ठरला ‘मोस्ट स्टायलिश’ सुपरस्टार, जान्हवी ‘मोस्ट स्टायलिश’ डेब्युटन्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:07 AM2018-12-20T00:07:58+5:302018-12-20T00:21:45+5:30

विनय अºहाना प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड या दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. लोकमतख्या मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सच्या या तिस-या पर्वात सिनेसृष्टीतील दिग्गजांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. बॉलिवूड स्टार रणवीर सिंग लोकमत मोस्ट स्टायलिश सुपरस्टार अवॉर्डचा मानकरी ठरला. ‘धडक गर्ल’ जान्हवी कपूर हिला लोकमत मोस्ट स्टायलिश डेब्युटन्ट पुरस्काराने गौरविण्यात आले.

अभिनेता राजकुमार राव ठरला लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर परफॉर्मर

भूमी पेडणेकर ठरली लोकमत मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार

मराठी स्टार आदिनाथ कोठारे याला लोकमत मोस्ट स्टायलिश अ‍ॅक्टरच्या पुरस्काराने गौरविले गेले

लोकमत मोस्ट स्टायलिश यूथ आयकॉन ठरला डॅशिंग अभिनेता कार्तिक आर्यन

मसाबा गुप्ता ठरली मोस्ट स्टायलिश फॅशन स्टायलिस्ट

अजय-अतुल यांना लोकमत मोस्ट स्टायलिश संगीतकार पुरस्कार